कथालेखन) एक शेतकरी ------ कोंबडी विकत घेणे------ दररोज एक सोन्याचे अंडे मिळणे------शेतकयाच्यया मनात लोभ------ काँबड़ी कापणे ------ एक ही अंडे न मिळणे ------ पश्चाताप------ तात्पर्य . (write in Marathi)
Answers
एकदा एका गरीब शेत कर्याने आपल्या मुलांना अंडी खायला मिळावीत म्हणून एक कोंबडी विकत घेतली. काही दिवसांनी तिने अंडी द्यायला सुरूवात केली. आणि काही आश्चर्य तिने पहिलेच अंडे सोन्याचे दिले. ते बघून शेत करी हरखला. त्याने ते अंडे बाजारात ने ऊन विकले. त्याला खूप पैसे मिळाले. दुसर्या दिवशीही कोंबडीने सोन्याचे अंडे दिले.
तो एकदम खूश झाला. तेही अंडे त्याने बाजारात विकले. अशा प्रकारे कोंबडी रोज एक सोन्याचे अंडे देऊ लागली. तो ते बाजारात विकू लागला.
रोज मिळणार्या पैशांमुळे त्याची परिस्थिती बदलू लागली. तो चांगले जीवन जगू लागला. हे पाहून त्याच्या शेजारच्याने त्याला विचारले तेव्हा त्याने त्याला त्या सोन्याचे अंडे देणारया कोंबडीबद्दल सांगितले.
तेव्हा तो शेजारी म्हणाला की ती कोंबडी जर रोज सोन्याचे अंडे देत असेल तर तिच्या पोटात कितीतरी सोन्याची अंडी असतील.
शेतकरी त्यावर विचार करू लागला. कोंबडीला मारून तिच्या पोटातली सर्व अंडी काढून विकली तर खूप श्रीमंत होऊ असे त्याला वाटले. त्या हव्यासापायी तो त्या कोंबडीला मारतो.
पण कोंबडीच्या पोटात त्याला एकही सोन्याचे अंडे सापडत नाही, तो उदास होतो. कोंबडी मेल्यामुळे त्याला आता रोजचे सोन्याचे अंडे मिळणेही बंद होते.
उपदेश : कोणत्याही गोष्टीचा हव्यास वाईटच.
Explanation:
This is ur answerr plz check out