Hindi, asked by iqramamooty, 3 days ago

कथा लेखन गर्वाचे घर खाली​

Answers

Answered by Jiya0071
3

Explanation:

एका गावात एक धनाढ्य व्यापारी होता. तो नेहमी परदेशीं व्यापारासाठी ये जा करीत असे. त्याच्या घरी कसलीच कमी नव्हती. भरपूर पैसे, दागदागिने, जमीन -जुमला हे सगळे होते. त्याच्याकडे खूप संपत्ती होती याचा त्याला नेहमी गर्व होत असे.

एके दिवशी व्यापारी मनुष्य असाच रात्री आपल्या घरी निवांत झोपला होता. तेवढ्यात त्याच्या दारावर कोणीतरी थाप मारू लागले. दरवाजा वाजण्याचा आवाज ऐकू येताच व्यापारी झोपेतून जागा झाला आणि त्याने दरवाजावर कोण आले आहे हे बघण्यासाठी दरवाजा उघडला तर बघतो तर काय दरवाजावर एक म्हातारी बाई उभी होती. व्यापाऱ्याने म्हातारील विचारले, " ए बाई! कोण आहेस तु? आणि एवढ्या रात्री माझे दार का वाजवीत आहेस? "

म्हातारी खूप घाबरलेली आणि रडवेली झालेली होती. म्हातारी म्हणाली, " शेटजी! माझे नाव सखू आहे. मी बाजूच्या जंगलाजवळ एका झोपडीत आपल्या मुलाबरोबर राहते. माझ्या मुलाची तब्येत खराब आहे. मला त्याच्या इलाजासाठी पैशाची गरज आहे. कृपा करून आपण मला थोडी पैशांची मदत करू शकता का? मी थोडे थोडे करून तुमचे सगळे पैसे नक्की परत करेन."

व्यापारी मनुष्य झोपेतून अचानक उठून आला असल्यामुळे ही म्हातारी कोण कुठली आणि अचानक पैसे मागत आहे जिला आपण ओळखत ही नाही मग मी हिला पैसे कसे काय देऊ असा विचार मनातल्या मनात करू लागला.काही वेळाने विचार करून मग व्यापाऱ्याने म्हातारीला पैसे देण्यास नकार दिला व त्याने दार लावून घेतले. म्हातारी निराश होऊन दुसरीकडे कुठे पैशांची व्यवस्था होते का ते बघण्यासाठी निघून गेली.

तीन महिन्यांनंतर व्यापारी मनुष्य एक दिवस असेच आपल्या व्यापार करून बाहेरगावावरून पुन्हा आपल्या घरी येत होता. गावात येण्यासाठी जंगलाच्या मार्गाने यावे लागत असे. जंगल सुरु झाले एवढ्यात व्यापाऱ्यांची गाडी बंद पडली. त्याने खाली उतरून ती गाडी दुरुस्त करण्याचा खुप प्रयत्न केला परंतु ती गाडी सुरूच होत नव्हती. जंगलात आता हळू हळू अंधार पडू लागल्यावर ते अजूनच भयावह वाटते होते आणि त्यात मुसळधार पावसाचीही सुरुवात झाली. पाऊस काही थांबणायचे नाव घेत नव्हता म्हणून व्यापारी ही घाबरला होता.

तेवढ्यात त्याची नजर दूर एका झोपडीकडे गेली जिथे थोडासा उजेड दिसत होता. तेथे काही तरी मदत मिळेल या आशेने व्यापारी त्या झोपडीच्या दिशेने चालू लागला. झोपडीजवळ गेल्यावर त्याने पाहिले की एक म्हातारी आणि एक मुलगा तिथे राहत होते. "कोणी आहे का?" असे व्यापारी म्हणाला. तेवढ्यात म्हातारी घराबाहेर आली. व्यापाऱ्याने आपली सगळी हकीकत तिला सांगितली व रात्रभरासाठी आसरा मिळेल काय असे विचारले.

म्हातारीने त्याला आपल्या झोपडीत रात्रभर थांबण्याची संमती दर्शविली व ती आत निघून गेली. काही वेळाने म्हातारी एक जेवणाचे ताट घेऊन आली आणि तिने व्यापाऱ्याला जेवण दिले. जेवून झाल्यावर व्यापारी तिथेच झोपडीत झोपून गेला.

सकाळ झाली तेव्हा व्यापारी झोपून उठला. त्याने त्या म्हातारीला ओळखले की हीच ती सखू आजी आहे जी त्याच्याकडे काही महिन्यांपूर्वी मुलाच्या इलाजासाठी पैसे मागायला आलेली होती. म्हातारीच्या मुलाने सकाळी व्यापाऱ्याची गाडी दुरुस्त करण्याऱ्या व्यक्तीला बोलावून आणले.

काही वेळातच व्यापाऱ्यांची गाडी दुरुस्त झाली. पण ज्या म्हातारीला तिच्या गरजेच्या वेळी आपण मदत केली नाही तिच बाई काल आपल्या गरजेच्या वेळी आपल्याला मदतीला आली हे त्या व्यापाऱ्याच्या मनुष्याच्या मनात सारखे सुरु होते आणि त्याला मनोमन वाईट ही वाटत होते. त्याला आता त्याची चूक चांगलीच कळली होती. त्याच्यातील संपत्तीचा गर्व आता कमी झाला होता

त्याचबरोबर म्हातारीला आपल्यातर्फे काही पैशांची मदत ही देऊ केली परंतु तिने ती नाही घेतली. आता मात्र या वेळी व्यापाऱ्याने म्हातारीला सांगितले की, या पुढे तिला कोणतीही गरज वाटल्यास नि:संकोचपणे आपल्याकडे यावे असे म्हणून त्याने म्हातारीचे व तिच्या मुलाचे मनापासून धन्यवाद मानून मग तो त्याच्या गावी निघून गेला.

Answered by nidhisanas
3

Answer:

एका नगरात दोन श्रीमंत व्यापारी राहत होते. ते एकमेकांना खाली पाडण्याची एकही संधी सोडत नसत. एकाचं नाव होतं, लक्ष्मीकांत आणि दुसऱ्याच नाव होत वत्सराज. दोघांपैकी लक्ष्मीकांत थोडा जास्त गर्विष्ठ होता. एक दिवस मागचे सर्व विसरून वत्सराज लक्ष्मीकांताला भेटावयास गेला. तो महालाच्या दरवाज्याजवळ आलेला पाहून लक्ष्मीकांताने आपल्या नोकरास बोलावून सांगितल, 'मी बाहेर गेलो आहे असं वत्सराजला सांग.' नोकर म्हणाला, 'पण शेठजी आपण तर घरी आहात मग असं सांगून कसं चालेल?'. त्यावर शेठजींना राग आला आणि म्हणाले, 'जेवढं सांगितलं आहे तेवढंच कर. स्वतःच डोकं वापरू नकोस'. नोकर चुपचाप दरवाज्याजवळ आला आणि वत्सराजला म्हणाला,' आमचे शेठजी बाहेर गेलेत. आपण नंतर आलात तर बरं होईल.' खरंतर वत्सराजने महालाच्या खिडकीतून लक्ष्मीकांत घरी असल्याच पाहिलं होतं. मात्र नोकराच्या उत्तराने तो अचंबित झाला आणि निघून गेला. त्यानेही मग लक्ष्मीकांतला घरी आल्यावर असंच सांगण्याच ठरवलं. या घटनेला काही दिवस उलटतात. ही घटना लक्ष्मीकांत विसरूनही जातो. लक्ष्मीकांताच्या एकुलत्या एका मुलीच लग्न ठरतं. संपूर्ण नगरात बोलावणी गेली. पण काही खास लोकांकडे लक्ष्मीकांत स्वतः गेला. तसंच त्याने वत्सराजाकडे स्वतः जाण्याच ठरवलं. वत्सराजाने मुख्य दरवाज्याजवळ लक्ष्मीकांत आला असल्याचं पाहिला होतं आणि तो कशासाठी आला असल्याचंही त्याला माहित होतं. 'शेठ घरात आहेत का?' अशी हाक ऐकून नोकर दरवाजा उघडण्यासाठी पुढे गेला. त्याला अडवीत वत्सराज म्हणाला, 'थांब, तू जाऊ नकोस. मीच जातो दरवाजा उघडायला.' हसरा चेहऱ्याने, हातात निमंत्रण पत्रिका घेऊन नमस्कार करीत उभ्या असलेल्या लक्ष्मीकांतला तो म्हणाला, 'आमचे शेठ घरात नाहीत. आपण नंतर आलात तर बरं होईल.' हे ऐकून लक्ष्मीकांत म्हणाला,' अरेच्या, तुम्ही स्वत:चं घरात नसल्याच काय सांगता?'. त्याला प्रतिउत्तर देत वत्सराज म्हणाला, 'काय हरकत आहे? मी तर त्या दिवशी तुझ्या नोकराच्या सांगण्यावर विश्वास ठेवून, तू घरात असतानाही निघून गेलो. आत्ता तर मी स्वत: सांगतोय तरी तुम्हाला विश्वास बसत नाही?' आपली चुक कळून लक्ष्मीकांत वरमतो आणि चुपचाप निघून जातो.

Similar questions