Hindi, asked by Dof, 4 months ago

१) कथा लेखन in marathi please

खालील शब्द गुंफून एक छानशी कथा तयार करा. कथेला शीर्षक देऊन योग्य तात्पर्य लिह

सिंह - उंदीर - शिकारी- जाळे​

Answers

Answered by Anonymous
20

Answer:

उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.

पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.

तात्पर्य:- जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच

Answered by mad210216
21

"लहानाची कीर्ति महान"

Explanation:

एकदा एका रानात एक सिंह छान झोपला होता. तो झोपलेला असताना तिथे एक उंदीर आला आणि सिंहाच्या अंगावर पळू लागला, ज्यामुळे सिंहाला त्रास होऊ लागला व तो झोपेतून उठला.

सिंहाला इतके राग आले की त्याने उंदराला पकडून त्याला मारण्याची धमकी दिली. उन्दिराने सिंहाची माफी मागून स्वतःला सोडून देण्याची विनंती केली.

त्याने सिंहाला आश्वस्त केले की गरज पडल्यावर तो त्याची मदत नक्की करेल. एक उंदीर आपल्याला मदत करेल या विचाराने सिंहाला हसू आले व त्याने त्याला जाऊ दिले.

थोड्या दिवसांनी एक शिकारी रानात आला आणि त्याने त्याच्या जाळ्यात सिंहाला अडकवले. सिंहाने जाळ्यातून निघायचे खूप प्रयत्न केले पण त्याला बाहेर निघणे जमले नाही.

सिंहाची गर्जना ऐकूण उंदीर तिथे आला आणि त्याने त्याच्या दातांनी जाळ तोडण्यास सुरु केले. मग सिंह जाळ्यातून बाहेर निघाला व त्याने उंदराचे आभार प्रकट केले.

तात्पर्य : प्रत्येक वेळी इतरांची मदत करावी आणि कधीच कोणाला कमी समझू नये.

Similar questions