India Languages, asked by Godofguys, 3 months ago

कथालेखन
खाली कथेचा उत्तरार्ध (शेवट) दिला आहे. त्यावरून कथा पूर्ण करा.(कथेला योग्य शीर्षक देऊन तात्पर्य लिहा.)
रामरावाने डोळे पुसले. तो बैलांना हाकारू लागला. स्वतः गाडीची चाके वर काढण्याचा प्रयत्न करू लागला. सगळी
शक्ती एकवटून त्याने जोर लावला आणि आश्चर्य म्हणजे क्षणार्धात त्याची गाडी चिखलातून बाहेर आली.​

Answers

Answered by mad210216
17

"प्रयत्नांती परमेश्वर"

Explanation:

  • एका गावात रामराव नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याचा देवावर फार विश्वास होता. तो रोज सकाळी शेती करायचा आणि दुपरच्यावेळी त्याची बैलगाडी घेऊन घरी परतायचा.  
  • पावसाचे दिवस होते. रस्त्यावर चिखळ जमा झालेले. रामराव नेहमीप्रमाणे त्याची बैलगाडी घेऊन घरी जात होता. तेव्हा, अचानक त्याच्या गाडीचे चाख रस्त्यावर जमा झालेल्या चिखलात अडकले.
  • गाडी चिखळातून बाहेर काढण्यासाठी त्याने देवाकडे प्रार्थना केली. रसत्यावरून येत जात असलेली लोकं त्याची मदत करायला पुढे येत होते, पण त्याने कोणाकडून मदत घेतली नाही व त्यांना सांगितले कि "मला तुमची आवश्यकता नाही. माझा देव माझी मदत करणार".  
  • बराच वेळ निघून गेला तरीही रामरावची गाडी तशीच चिखलात अडकली होती. आपण देवाची इतकी भक्ति करूनसुद्धा देव आपली मदत करत नाही, या विचाराने रामराव खूप दुखी झाला.  
  • शेवटी त्याने स्वतःच चाख चिखलाबाहेर काढायचे ठरवले. त्याने संपूर्ण शक्ति एकवटून जोरात गाडीला धक्का दिला आणि क्षणातच गाडी चिखलातून बाहेर निघाली.  
  • तेव्हा त्याला कळले की जर इतक्या वेळापासून आपण स्वतः प्रयत्न केले असते तर आपला वेळ वाया गेल्या नसता.  
  • तात्पर्य: जो माणूस स्वतःची मदत करतो, देवसुद्धा त्याचीच मदत करतो.
Similar questions