कथालेखन:खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा व तिला शीर्षक दया.
एक शेतकरी - त्याला दोन मुलगे - थोरला कष्टाळू - धाकटा आळशी -आईवडिलांचा तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी सल्ला- 'सावलीतून शेतात जा व सावलीतूनच घरी- थोरल्याने सल्ला पाळला - धाकट्याने घरापासून शेतापर्यंत मंडप तयार केला -
टप्परिणाम - द:खी - माफी मागणे - चांगला वागण्याचा निर्णय .......
Answers
कथालेखन: खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा व तिला शीर्षक दया
कष्टाचे महत्व
एक शेतकरी होता. त्याला दोन मुले होती. थोरला खूप कष्टाळू होता तर धाकटा अतिशय आळशी होता. शेतकऱ्याला कळेना की धाकट्याला कष्टाचे महत्व कसे समजावून द्यावे.
एक दिवस शेतकरी तीर्थयात्रेला निघाला. जाताना त्याने दोघांना वडिलकीचा सल्ला दिला. त्याने सांगितले की रोज सावलीतून शेतात जा आणि सावलीतून घरी या. धाकट्याला काही कळेना. मग त्याने शब्दशः अर्थ काढून शेतापर्यंत मंडप तयार केला आणि मग तो आरामात हवं तेव्हा शेतात जाऊ लागला.
थोरला हुशार होता. त्याला वडिलांनी दिलेल्या सल्ल्याचा अर्थ कळला . तो रोज सूर्योदयापूर्वी शेतात जाऊ लागला आणि सूर्यास्तानंतर घरी येऊ लागला. त्यामुळे त्याचे शेतातील काम भरपूर होऊ लागले आणि उत्पन्नही वाढले.
वडील परत आल्यावर दोघांनी आपण काय केले ते सांगितले. तेव्हा वडिलांनी थोरल्याला शाबासकी दिली आणि धाकट्याला सांगितले की कष्टाला पर्याय नाही.
धाकट्याला आपली चूक समजली आणि त्याने वडिलांची माफी मागितली.
Answer:
खालील मुथांवरून कया तयार करा व कथेला योग्य शीर्षक द्या. शेतकरी लारामुले-आळशी
शेतकरी मृत्युशय्येवर मुलांना -संदेश- शेतात खजिना लपविल्याची माहिती-- शेतकऱ्याचा मृत्यु मुलांबी शेत खोदण-- खजिना न सापडो मात्र भरपूर पिक,