India Languages, asked by shraddhagurav177, 11 months ago

। कथालेखन
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहून पूर्ण करा. कथेला योग्य शीर्षक
द्या.
एकगाव - गावात सर्कस येणे - सर्कशीतील हत्ती - बाजारपेठेतून जाताना शिंप्याशी मैत्री - शिंप्याने हत्तीची गंमत करणे - केळ देताना सोंडेला सुई
टोचणे - हत्तीने सोंडेमध्ये घाणेरडे पाणी आणणे - दुकानाची नासाडी करणे- तात्पर्य.​

Answers

Answered by rameshkarjol61
5

Answer:

एका तळ्याकाठी माकडं, ससे, हरणं, खारी, हत्ती असे खूप सारे प्राणी राहात असतात. ते सगळेजण आपापल्या नादात असायचे. कोणी कोणाशी बोलायचे नाहीत, की एकमेकांशी खेळायचे नाहीत. त्यातल्या एका छोट्या सशाशी मात्र सगळेजण गप्पा मारायचे. त्यामुळे त्याला वाटायचं, की तो सगळ्यांचा अगदी आवडता मित्र आहे.

मृणाल तुळपुळे

एका तळ्याकाठी माकडं, ससे, हरणं, खारी, हत्ती असे खूप सारे प्राणी राहात असतात. ते सगळेजण आपापल्या नादात असायचे. कोणी कोणाशी बोलायचे नाहीत, की एकमेकांशी खेळायचे नाहीत. त्यातल्या एका छोट्या सशाशी मात्र सगळेजण गप्पा मारायचे. त्यामुळे त्याला वाटायचं, की तो सगळ्यांचा अगदी आवडता मित्र आहे.

एके दिवशी खेळता खेळता सशाच्या पायाला दगड लागला आणि त्यातून रक्त यायला लागलं. पाय दुखायला लागला. खूप भूक लागली असूनही दुखऱ्या पायामुळे त्याला तळ्याकाठची पानं खायला जाता येत नव्हतं. तेवढ्यात त्याला एक माकड दिसलं. सशानं त्याला विचारलं, ‘माझा पाय खूप दुखतो आहे आणि मला भूकही लागली आहे. मला जरा त्या झाडावरची फळं काढून देतोस का?’

माकड म्हटलं, ‘दिली असती रे; पण मला आत्ता खूप महत्त्वाचं काम आहे रे. तिकडे जायचं आहे.’

झाडावरची खार ते ऐकत होती. तिनं पटकन झाडाची थोडी कोवळी पानं तोडली आणि सशाला नेऊन दिली. त्याची विचारपूस केली आणि लवकर बरा हो, असं सांगून ती पुढे गेली.

सशानं खारीचे आभार मानले. त्याला पानं खाल्ल्यावर जरा बरं वाटलं. तेवढ्यात त्याला काही शिकारी त्याच्या दिशेनं येताना दिसले. त्यानं जवळच चरत असलेल्या हरणाला विचारलं, ‘माझा पाय दुखतो आहे. त्यामुळे मला पळता येत नाही. तू मला तुझ्या पाठीवर बसवून लांब घेऊन चल आणि त्या शिकाऱ्यांपासून वाचव.’

हरीण म्हणाले, ‘नेलं असतं रे; पण मला आता त्या तळ्यापलीकडच्या मित्रांना भेटायला जायचं आहे.’

इकडे शिकारी जवळ यायला लागले, तसा ससा खूप घाबरला. त्याला कळून चुकलं, की तो आता त्यांच्या जाळ्यात सापडणार. पाय खूप दुखत होता. पळताही येत नव्हतं. तो तसाच पाय खुरडत खुरडत लपायला जागा शोधू लागला.

तेवढ्यात कोणीतरी विचारलं, ‘असा का चालतो आहेस? पायाला लागलं आहे का?’

सशानं वर बघितलं, तर हत्तीचं पिल्लू होतं. सशानं त्याला शिकाऱ्यांबद्दल सांगितलं, तर त्यानं आपली सोंड पुढे केली. म्हणालं, ‘बस इथं. मी तुला माझ्या घरी घेऊन जातो.’

ससा हत्तीच्या सोंडेवर बसून त्याच्या घरी गेला. हत्तीच्या आईनं त्याच्या पायाला औषध लावलं. त्याला खाऊ-पिऊ घातलं. पाय बरा झाल्यावर सशानं हत्तीच्या पिल्लाचे आणि त्याच्या आईचे खूप खूप आभार मानले. जाताना हत्तीण त्याला म्हणाली, ‘आपण सर्वांना आवडतो अशा खोट्या भ्रमात राहू नकोस. खरे मित्र कोण आहेत, ते ओळखायला शिक. जे संकटाच्या वेळी मदत करतात, ते आपले खरे मित्र.’

ससा म्हणाला, ‘मी हे सगळं लक्षात ठेवीन. त्यानं परत एकदा हत्तीचे आभार मानले आणि तो उड्या मारत आपल्या घरी परतला.’

सांगा ना गोष्ट : सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

Answered by trilokkuradiya161
0

Answer:

here your answer in image

thank u for visiting

Attachments:
Similar questions