कथालेखन
खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा.
दोन बोके-लोण्याचा गोळा मिळणे-वाटणीवरून भांडण-माकडाचेतराजूघेऊन येणे-वाटणी करून
देण्याच्या निमित्तानेस्वत:च लोणी खाणे-दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ.
Answers
नमस्कार,
★ दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ (कथालेखन) -
संध्याकाळची वेळ होती. रस्त्यावर एक लोण्याचा गोळा पडलेला होता. एकाच वेळी त्यावर दोन बोक्यांची नजर पडली. परंतु दोघांचा एकमेकांवर भरोसा नसल्यामुळे त्याच्या वाटणीवरून त्यांच्यात भांडण होते. दोघांना वाटते की समोरच्याने वाटणी केली तर तो स्वतःला जास्त भाग घेईल.
रस्त्याच्या कडेने जाणारे माकड हा सर्व संवाद ऐकून समोर आले. मी तराजू घेऊन दोघांना बरोबर वाटणी करून देतो, हा पर्याय त्याने मांडला. तो अपक्ष असल्यामुळे दोन्ही बोक्यांनी चटकन त्याच्यावर विश्वास ठेवला.
माकडाने मापणाला सुरुवात केली. एका तराजूत थोडे लोणी जास्त होत आहे म्हणून त्याने थोडेसे लोणी खाऊन टाकले. परत काटा केला मग दुसऱ्या बाजूला लोणी अधिक होते म्हणून त्यातूनही थोडा वाटा घेतला. असे करत करत त्या माकडाने सर्व लोणी संपवुन टाकले.
तो समान वाटणी करेल यावर विश्वास असलेल्या बोक्यांना अद्दल घडली. शेवटी दोघांच्या लोण्यावरून झालेल्या वादात माकडाने स्वतःचा स्वार्थ साधून घेतला. म्हणतात ना - 'दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ।'
धन्यवाद...
Answer:
दोघांच भांडण तिसऱ्याचा लाभ" .... मराठीतली एक म्हण ! लहानपणी या म्हणीचा अर्थ समजावून सांगण्यासाठी शाळेत सांगितलेली लोण्याच्या गोळ्यासाठी भांडणाऱ्या दोन बोक्यांची गोष्ट आठवते का ? त्या दोन बोक्यांच्या भांडणाचा फायदा घेत एक चतूर माकड सगळे लोणी फस्त करुन पळून जात आणि दोन्ही बोके हताश होऊन हात चोळत बसतात. पण ती गोष्ट छोट्यांसाठी होती. खूप वर्ष झाली त्या गोष्टीला ! ही गोष्ट मोठ्यांसाठी आहे कारण आता दोन्ही बोके हुषार झाले आहेत. आपण एकत्र आलो तर माकडाला संधी कशाला मिळेल ? असा विचार करुन ते दोघे एकत्र येतात आणि आपसात लोणी वाटून खायच ठरवतात. थोडाफार वाद अधूनमधून झाला तरी आपसात ते मिटवत असत. अशा प्रकारे एकंदरीत ८-१० वर्ष बरी गेली होती त्यांची !