India Languages, asked by Godofguys, 3 months ago

कथालेखन
खाली दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कथा लिहा.
-
(मुद्दे – नदीच्या काठी झाड - झाडान्नर कबूतर – मुंगी पाण्यात पडते – कबूतर पान टाकून
मुंगीला वाचवतो – शिकारी – कबूनरावर बंदूकीचा नेम - मुंगी पायाला चाबने – नेम चुकतों
कबुतराचा जीव वाचनो)​

Answers

Answered by studay07
21

Answer:

                             मदतीपासून मदतीपर्यंत

एक जंगल असते , त्या जंगलामधून एक नदी वाहत असते. त्या नदीवर पाणी

पिण्यासाठी सर्व पक्षी आणि प्राणी येत असतात.  एकेदिवशी एक कबुतर नदी

काठच्या झाडावर बसलेले असते.  तेवढ्यात कबुतर पहाते कि एक मुंगी पाण्यात

पडते, आणि कबुतर त्या मुंगीला वाचवते ,कबुतर पाण्यात झाडाचे पान टाकते,

आणि मुंगी त्या पानावर चढते आणि नदीकाठापर्यंत पोहचते आणि तिचा जीव

वाचतो,  एके दिवशी कबुतर असेच झाडावर बसले असताना एक शिकारी

कबुतराला पाहतो आणि कबुतरांची शिकार कार्याचा विचार करतो. शिकारी

कबुतरावर नेम धरत असतो तेवढ्यात मुंगी पहाते आणि त्या शिकाऱ्याला पायाला

चावते आणि शिकाऱ्याचा नेम  चुकतो,  आणि कबुतर हि सावध होते.  आणि अशा

प्रकारे मुंगी कबुतराचा जीव वाचवते. आपण या गोष्टीवरून शिकू शकतो कि नेहमी मदत केली पाहिजे ,

Answered by narayaninrao3157
12

Answer:

एकदा एक कबुतर नदीजवळच्या झाडावर बसले होते. त्याला एक मुंगी नदीच्या पाण्यात वाहुन जाताना दिसली. त्या मुंगीला पोहता येत नव्हते. ती बुडु नये म्हणुन धडपड करत होती. तिची धडपड पाहुन कबुतराला दया आली.

कबुतराने पटकन एक झाडाचे पान तोडले, आणि मुंगीकडे उडाले. त्याने ते पण मुंगीजवळ पाण्यात टाकले. मुंगी त्या पानावर चढली. पान तरंगत नदीच्या किनाऱ्याला लागले आणि मुंगीचा जीव वाचला. जमिनीवर येऊन तिने कबुतराचे आभार मानले.

काही दिवसांनी एक शिकारी बंदुक घेऊन जंगलात आला. जंगलात फिरताना त्याला झाडावर कबुतराचे घरटे दिसले. कबुतर आपल्या लहान पिल्लांशी खेळण्यात मग्न होते. त्याचे लक्ष शिकाऱ्याकडे नव्हते.

शिकाऱ्याने हळुच बंदुक वर काढुन कबुतराला मारण्यासाठी नेम धरला. पण मुंगीने त्याला असे करताना पाहिले आणि कबुतराला वाचवण्यासाठी शिकाऱ्याला जाऊन पायावर कडाडुन चावली.

शिकारी कळवळला आणि त्याच्या गोळीचा नेम चुकला. पायाची आग थांबवायला तो खाली बसुन पाय चोळु लागला. पण तेवढ्यात बंदुकीच्या आवाजाने कबुतर सावध झाले आणि उडून गेले.

निराश होऊन शिकारी परत निघुन गेला, आणि कबुतराचा जीव वाचला.

Explanation:

Hope it will help you...

Similar questions