२. कथालेखन
१) लोभी माणूस।
Answers
Answer:
कथा लेखन लोभी माणूस -तपश्चर्या -परमेश्वर प्रसन्न -वरदान -सूर्य मावळेपर्यंत जेवढा धावत जाशील तितके जमीन तुझी- पळत राहतो- सूर्यास्त होतो -शेवटी थकून मरून पडतो- अति लोभाचे फळ
Explanation:
Answer:
लोभी माणूस।
मित्रांनो प्रसिद्ध रशियन लेखक टॉल्स्टॉय यांची एक सुरेख कथा आहे. एका लोभी माणसावर देव प्रसन्न झाला आणि म्हणाला ‘सकाळ संध्याकाळ पर्यंत जितक्या जमीनीवर तुझी पावूले पडतील तितकी जमीण तुझी होईल. आता तुला किती जमीन हवी हे तू ठरवायच आणि त्या प्रमाणे प्रयत्न करायचा’ माणूस लोभीतर होताच शिवाय लोभामुळे विचार क्षमता ही गमावून बसला होता. म्हणूनच देवाच्या बोलण्याचा आशयही समजू शकला नाही. त्याने विचार केला कि चालत राहिलो तर अशी कितीशी जमीन त्याब्यात येणार त्या पेक्षा पळत निघालो तर जास्ती जास्त जमीन आपल्याला मिळवता येइल. बस ठरल पळायच.
त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सूर्योदया पासून त्याने पळण्यास प्रारंभ केला. पळता पळता दुपार झाली. भूक लागली. पण थांबलो तर आपलच नुकसान आहे.
तहान भूक तर काय रोजचीच आहे. अशी संधी परत थोडी मिळणार म्हणून तहान भूक सर्व विसरून तो तसाच पळत राहिला. अर्थात संध्याकाळ पर्यंत त्याने बर्या पैकी जमीनीचा ताबा ही मिळवला आता खर म्हणजे थांबायला काहीच हरकत नव्हती पण जमीन तर त्याच्यापुढे अजूनही पसरली होती आणि त्याला खुणावत ही होती. म्हणूनच वेळ संपण्याच्या आत म्हणजे सूर्यास्ता पूर्वी जास्तीत जास्त जमीनीच्या हव्यासापायी तो जिवाच्या आकांतन परत एकदा पळत सुटला आणि लेखक म्हणतो की इथेच त्याचा निर्णय चुकला कारण दिवसभराच्या अतिश्रमाने तो थकला होता तशात पोटात काही नव्हते. परिणाम व्हायचा तोच झाला. वेळ संपली आणि तो तिथेच गतप्राण होवून कोसळला. नंतर परत उठलाच नाही. अती श्रमाने त्याचे निधन झाले. विशेष म्हणजे ज्या जमिनी पायी त्याने आपले प्राण गमावले होते त्याच्या मृत्यूनंतर ती फक्त त्याच्या करता साडेतीन हातच पुरेशी ठरली होती.
कथा इथे संपते पण कुठे तरी विषण्ण होते कथेचा आशय नंतरही बर्याच वेळ मनात घर करून राहतो. विचारांना प्रवृत्त करतो. वाटत खरच इतका लोभ इतका हव्यास त्याला करण्याची काही गरज होती का. म्हणजे ही कथा कल्पना जरी असली तरी सत्याच रूप घेवून आपल्या समोर येते कारण आपल्या भोवती समाजात जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतांना बघतो तेव्हा ही कल्पना जरी असली तरी तिची तिक्ष्णता जास्तच जाणवते. आपल्या संवेदनाला जास्तच उदास करते. कल्पनेला सत्याचा आभास येऊ लागतो. साहित्य हा समाजाचा आरसा आहे म्हणतात ते यासाठीच.
अर्थात कुठे थांबयला हवे हे ज्याचे त्यालाच कळायला हवे. इतक्या विवेक पूर्ण बुद्धीचा वापरतर करता आलाच पाहिजे. कारण हे ज्याला करता येत तोच प्रगतीपथावर चालू शकतो. त्यालाच मोहाचे क्षण टाळता येतात. या करता अगदी संत महात्माच असायला हवे अस ही नाही. स्वविवेक हित अहित ओळखण्याची बुद्धी सर्वांना सारखीच मिळाली आहे. फक्त जागरूक पणे आणि प्रसंगी कठोर होवून त्याचा वापर करता आला पाहिजे. जीवनाच्या प्रवासात या गोष्टी सावली सारख्या बरोबर असतात म्हणूनच कोणत्या वेळी कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायच हे ही समाजायला हवे आणि हे सर्वस्वी आपल्यावर निर्भर असत. हे कोणी शिकवून शिकता येत नाही. पुढच्यास ठेच मागचा शाहणा म्हणतात ते या करतातच.
कधी कधी मोहाचे हे क्षण आपल्यासाठि आत्म घातकी आहेत हे कळूनही दूर सारता येत नाही याच मूळ कारण म्हणजे जीवनात सतत वाटत असणारी अनिश्चितता. खात्री नसलेला पण करावा लागणारा जीवन प्रवास आणि वाट बघण्याची तसदी न घेता प्रवासाच्या पहिल्याच टप्प्यात सर्व काही मिळून जाण्याचा हव्यास. विशेष करून सध्या काळात प्रचार माध्यमांनी तर ह्या गोष्टींची नव्या पिढीला एक आगळी वेगळीच चटक लावली आहे. एका रात्रीतच ते सर्व काही मिळवू पाहत आहे. त्या करता आवश्यक असलेले श्रम घेण्याची ही त्यांची इच्छा नाही. वाट बघण्याची आवश्यकता त्यांना वाटत नाही किंवा तितका पेशंसही नाही. चित्रपट गायन स्पर्धेत मुलाची निवड झाली नाही म्हणून परिक्षकांसमोर मुलाचे वडील गुडघे टेकून याचना करत असल्याचे दृश्य ही एका चेनल वर दाखविण्यात आले. बघून ही त्या बापाची कीव येत होती पण त्याला त्याच काही नव्हत परिक्षकांनी परत व्यवस्थित अभ्यास करून मुलाला परत पाठविण्यास सुचवले पण वडिल तर त्याला एका रात्रीतच तानसेन करण्यास निघाला होता. सर्वच क्षेत्रात जवळ पास हे असच चालल आहे पण ह्या अतिरेकी हव्यासाचे दूर गामी परिणाम काय होतील हे थांबून विचार करण्याची वेळ कोणाकडे नाही. सर्वच धावत निघाले आहेत जास्तीतजास्त जमीन पाया खालती कशी घालता येईल या इर्ष्येने.