India Languages, asked by kumarakanksha46, 4 months ago

कथा लेखन 'मी नागरिक' in marathi​

Answers

Answered by gauripagade20
289

ok

answer

मला भारत देशाचा नागरिक असल्यचा अभिमान आहे

''मला भारत देशाचा नागरिक असल्याचा अभिमान वाटतो / अभिमान नाही वाटत''

विषयांवर लिहिण्या आधी मी भारतीय आहे व भारतीय संविधान अनुसरूनच माझे आचरण असेल अशी मी प्रतिज्ञा करते,

कारण लिहिण्याचे-बोलण्याचे स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्याचा दूरूपयोग माझ्या भाषेतुन होऊ नये.कान सरळ हाताने पण धरता येतो व मानेच्या मागुन हाथ नेऊन सुद्धा.------

माझा जन्म स्वातंत्र्याच्या नंतरचा. म्हणजे एक प्रकारे स्वातंत्र्य माझ्या ताटात पकवान्ना प्रमाणे वाढले गेले,नुसते मला नव्हे तर माझ्या पिढीच्या लोकांना सुद्धा.पण त्या मागचे कष्ट ,बलिदान ह्यापिढी ने भोगले नसल्याने त्यांनी स्वातंत्र्य गृहितच धरले.असे मला वाटते.

साध्या दोन घासाच्या जेवणा करिता होणारे हजारो कष्ट मी माझ्या आजी कडून एकले आहे.ती सदा आम्हा बजावत असे पानात अन्न टाकू नका .मिठ सांडू नका नाही तर डोळ्याच्या पापणिने उचलावे लागेल,त्यावरुन कल्पना येते की आजच्या दृष्टि ने त्या कळात साध्या मिठा करिता सुद्धा बाईला किती झगडावे लागले असणार. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे भारतिय स्त्री ने सुद्धा स्वातंत्र्य प्राप्तित मोलाचे योगदान केलेले आढळते.रमाबाई रानडे,सावित्री बाई फुले ह्यांनी तर प्रत्यक्ष पणे लढा लढविला पण आपल्या कुटुंबियांचा भार आपल्या खांद्यावर घेऊन पती-पुत्र ह्यांना देशा करिता मोकळे ठेवण्यांरा स्त्रीयांनी पण अप्रत्यक्ष पणे जास्त मोलाचे योगदान केले आहे त्यांची यादी आपण करु शकत नाही.

अश्या पूर्वज स्त्रीयांचा अनमोल वारसा ज्या राष्ट्रा कडून मला मिळाला त्या राष्ट्राचा मला अभिमान तर आहेच ,मी त्यांची ऋणी सुद्धा आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर च्या काळात भारतातील स्त्रीया देशाचा विकास घडविण्यात हातभार लावत आहेत.साधी आकडेवारी पाहिली तर असे दिसते की भारतातील सर्वसामन्य स्त्रीया बालवाडी,अंगणवाडी,प्राथमिक शिक्षण,परिचारिका,सफाईकामगार,शेतमजूर विणकर अश्या वेगवेगळ्या कामामध्ये तर हातभार लावतच आहे,त्या पलिकडे पूर्वि पुरुषांचे वर्चस्व असलेल्या सैन्य शाखेत पण प्रवेश केला आहे.संगणक,व्यवस्थापन आदी क्षेत्रे पण त्या हाताळत आहे.

परंतु आता गरज आहे स्त्रीयांनी सार्वजनिक जीवनात निर्भयपणे पाउल टाकण्याची.स्त्रीयांना स्वतंत्रतेचा भरपूर वाव मिळाला पाहिजे,मिळत ही आहे .हळू-हळू त्या आपल्या लेखणीतून स्त्रीप्रश्न ,समाजप्रश्न मांडू ही लागल्या आहे पण राजनीतिक क्षेत्रात मात्र अजून मागे आहे.

आपल्याकडे भरपूर कौशल्य आणी भरपूर चिवटपणा गेली अनेक दशके जगून-तगून राहताना स्त्रीयांच्या अंगी असतेच म्हणजे असे कि इंग्लैड,अमेरिकेतील स्त्रीया थोडा जरी त्यांच्या दिनक्रमात बदल झाला तर त्यांना जड-तोड करणे कठिण जाते,परंतु भारतिय स्त्रीया जडतोड करतच जगत असतात आणि त्यातूनच त्यांच्या मध्ये एक व्यवहारिक हुशारी व ताकद आली आहे,त्या मोठी कामगिरी बजावू लागल्या आहे

पण त्यासाठी मिळणारया संधी, सोई अजुन ही अपूरया आहे.

स्वातंत्र्य प्राप्तिचा एव्हडा काळ लोटल्यावर ही अजुन हव्या त्या सोई ,नियम-कानून स्त्री करिता आले नाही ह्याची खंत वाटते.त्या घरा बाहेर निघाल्या,मिळवत्या झाल्या पण स्वातंत्र्य तेव्हडच मिळाले की ज्या मुळे पितृसत्तेचे सिंहासन हलता उपयोगी नाही.मानसिक स्वातंत्र्य मिळाल्या शिवाय अजुन ही स्त्री परतंत्र आहे.

* हुंड्या करिता हुंडा निषेध अधिनियम,विवाहित महिला सपंत्ति अधिनियम जरी आले असले तरी ते अजुन अपुरे आहेत.

स्वातंत्र्याचे खरे स्वरुप स्त्री स्वातंत्र्यानेच अधिक खुलून येईल त्या साठी योग्य ते प्रयत्न होणे गरजेचे आहे.

ok like follow me

mark as

branllieast

Answered by ravisgupta7995
11

Answer:

मी नागरिक

Explanation:

मी या देशाचा नागरिक या नात्याने माझा देश स्वच्छ सुंदर हरित रहावा यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मला हे संपूर्ण विश्व भारतीय म्हणून ओळखत असल्याने मला माझ्या समाजातील धर्माचा जातीचा फारसा अभिमान नाही. मला माझ्या देशात लोक एकसंघ राहतील यासाठीच जबाबदारीने वागायचे आहे. मला माझ्या देशाचे उत्प्नन वाढावे यासाठी नियमित आयकर देणे माझे कर्तव्य समजतो. मला माझ्या देशातील प्रथम शेतकरी हा विकसित झाला पाहिजे असे वाटते. माझ्या देशातील वाढत्या लोकसंखेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मी कुटुंब नियोजन वर भर देणार आहे. माझ्या देशातील महिलांचे प्रमाण असमतोल झाल्यामुळे मूली वाचवा कुटुंब जगवा हाच माझा नारा असेल. माझ्या देशात असंख्य कुपोषित लहान मुले आहेत त्यांच्या या भुकेच्या प्रश्नावर उत्तर शोधायची जबाबदारी माझी असेल.

Similar questions