India Languages, asked by manjunath91, 11 months ago

कथा लेखन:मिठाईचा दूकान_गरीब उपाशि मुलगा_मिठाईचा वास घेतो_मिठाईवाला पैसे मागतो_चाणाक्ष वकील ऐकतो_खिशातिले नाणी वाजवतो_मिठाईच्या वासाचा किंमत_मिठाईवाला गप्प​

Answers

Answered by mangeshkendre8649
49

मनिष नावाचा एक मुलगा होता तो गरीब होता परंतु प्रामाणिक व सुजूतदार होता. तो गरीब असल्यामुळे व अनाथ असल्यामुळे तो बिचारा एकटाच होता,एके दिवशी तो काही काम करायचं आणि थोडं फार कमवायचा हे ठरवलं.पण त्याला कुणी काम दयायला तयार झालं नाही म्हणून तो बिचारा निराश होऊन मिठाईच्या दुकानजवळ बसला होता .

त्याने सकाळ पासून काही खाल्ले नव्हते.तो मिठाई घेण्याचा विचार करत होता परंतु पैसे नसल्याने तो काही विकत घेऊ शकत नव्हता.पण जेव्हा मिठाईचा वास येतो तेव्हा तो स्वतःला थांबवू शकत नव्हता पण त्याने त्याचा मनावरचा ताबा सोडला नाही. पण त्या दुकांच्या दुकानदाराला हे पटत नव्हते.

तो दुकानदार खुप दुष्ट व वाईट वृत्तीचा होता त्याने मनीष सोबत गैर वरतन केले हे सार एक वकील पाहत होते, ते त्या माणसाच्या जवळ गेले व त्याला विचारले की याने काय केलं की तु एवढं त्याला सुनावतोय?

तो दुकानदार त्या वकीलाला उलट बोलून म्हणाला की तु का एवढी त्याची बाजु घेतोय ,तो समजूतदार वकील बाकीच्या लोकांना काय प्रसंग झाला हे विचारतो,तेव्हा बाकीचे लोक सागतात की तो दुकानदार खूप वाईट व धूर्त असून सगळयांनाच त्रास देतो आज त्याने या मुलाचा काही दोष नसून देखील त्याचावर मिठाईचा वास घेतल्याचा आळ आणला आणि मिठाईचा वास घेतल्याचे पैसे दे,तेव्हा वकील त्याला त्याच्या खिशातील पैशाची पिशवी वाजून दाखवली .

आणि सांगितलं घे तुझे पैसे तुला मिळाले का तो बोलला कसे तर तो वकील बोलला त्या मुलाचा काही दोष नसताना देखील तु त्याच्या कडे वासाचे पैसे मागतो, तसेच तुला देखील मी तसेच उत्तर दिले.

त्याच्या नंतर सगळेच लोक त्याची प्रशंसा करतात व तो त्या मुलाला घेऊन घरी जातो आणि त्याचा योग्य सांभाळ करतो.

Similar questions