India Languages, asked by narendrawankhede67, 27 days ago

कथा लेखन:
मुद्दे- बेडकांचे राज्य–स्पर्धा–चिकट खांबावर चढणे–बेडकांची माघार–लहान बेडूक–इतरांचे न एकने– स्पर्धा जिंकणे​

Answers

Answered by mangalkurane60
8

Explanation:

एका प्राचीन नगरामध्ये एक भले मोठे सरोवर होते. त्या सरोवरात अनेक बेडके वास्तव्याला होते. सरोवराच्या मधोमध धातूचा एक खांब होता. सरोवर बनवणार्‍या राजाने तो खांब बांधला होता. खांब खूप मोठा आणि चिकट होता. एक दिवस काही बेडकांनी मिळून एक स्पर्धा आयोजित केली. स्पर्धेत भाग घेणार्‍या बेडकाला सरोवराच्या मधोमध असणार्‍या धातूच्या चिकट खांबावर चढावे लागणार होते आणि जो बेडूक पहिला चढेल तो विजेता घोषित केला जाईल, असे ठरले. स्पर्धेचा दिवस आला, चारी दिशांनी गर्दी जमली. आसपासच्या सर्व परिसरातून मोठ्या संख्येने बेडकं आले. परिसरात एकच लगबग सुरू झाली. ही स्पर्धा कशी आणि कोण जिंकणार याचीच चर्चा सर्व बेडकांमध्ये होती, कारण इतक्या चिकट खांबावर चढणे त्यांच्यासाठी केवळ अशक्य होते. जो बेडूक वर चढण्याचा प्रयत्न करीत होता, तो अपयशी होत होता. थोड्या वर चढून तो परत खाली पडत होता, स्पर्धेतील बरेचं बेडकं पुन्हा-पुन्हा पर्यंत करत होते. परंतु बेडकांच्या तोंडून हे होऊ शकत नाही, हे अशक्य आहे, असे नकारात्मक वाक्यच ऐकायला येत होते. हे सर्व ऐकून, जे उत्साही बेडूकं होते ते देखील हताश झाले आणि त्यांनी आपले प्रयत्न सोडून दिले. स्पर्धेत मोठ्या बेडकांच्यामध्ये एक लहान बेडूकही होते, जो सतत वर चढण्याचा प्रयत्न करीत होता आणि खाली पडत होता, मात्र तो परत त्याच उमेदीने उठून वर चढत होता. अनेक प्रयत्नांनंतर तो त्या खांबावर पोहोचला आणि स्पर्धा जिंकला. त्याच्या विजयावर बाकीच्या बेडकांना खूप आश्चर्य वाटले, सर्व बेडके त्या विजेत्या बेडकाला घेरून उभे राहिले आणि विचारू लागले- ‘‘तू हे असंभव काम कसे संभव केले. तुला आपले लक्ष्य प्राप्त करण्याची शक्ती कुठून मिळाली?, जरा आम्हाला पण सांग की, तू हा विजय कसा मिळवलास?’’ तेव्हा मागून एक आवाज आला- ‘‘त्याला काय विचारताय्‌, तो तर बहिरा आहे. इतरांच्या नकारात्मक गोष्टी त्याच्या कानावर पडल्याच नाहीत आणि तो सतत प्रयत्न करत राहीला आणि खांबावर चढला.’’ तो बहिरा असल्याने खांबावर चढण्यासाठी सगळे त्याला प्रोत्साहित करत आहेत, असेच वाटले आणि त्याने स्पर्धा जिंकली.

Similar questions