Hindi, asked by patilmaya428, 5 hours ago

कथा लेखन- मुद्दे-एक लहान बालक -गरीब आई बरोबर झोपडीत राहणे- पावसाळ्याचे दिवस- भंयकर वारा व पाऊस- रेल्वे रूळ उखडणे-त्याच्या नजरेत येणे- अंगात ला तांबडा शर्ट काढून आगगाडी थांबवणे-प्रवाशांचा संताप-इंजिन ड्रायव्हर ची नजर-रूळ वाहून गेलेला -मुलामुळे प्रवासी प्राण वाचणे -राष्ट्रपतींद्वारा सन्मान-तात्पर्य लिहा.​

Answers

Answered by mad210216
99

कथा लेखन

Explanation:

  • जागरूकतेचे महत्व

  • एका गावात नितेश नावाचा एक मुलगा राहायचा. त्याच्या घराची परिस्थिती वाईट होती. तो त्याच्या आईसोबत झोपडीत राहायचा.
  • पावसाचे दिवस होते. एक दिवशी मोठ्या प्रमाणात पाऊस आणि वारा वाहत होता. त्यामुळे, रेल्वेचे रूळ उखडून गेले.
  • नितेशने ते पाहिले. काही मिनिटांतच त्याला आगगाडीचा आवाज ऐकू आला. आपण आगगाडीला थांबवायला पाहिजे, या विचारने त्याने त्याचे तांबड्या रंगाचे शर्ट काढले व तो शर्ट आगगाडीसमोर फडकवू लागला.
  • रेल्वे इंजिन चालकाने लाल शर्ट पाहून गाडी लगेच थांबवली. तेव्हा, रेल्वे चालकाची नजर वाहत चाललेल्या रेल्वे रूळावर गेली.
  • नितेशच्या या कृत्यामुळे अनेक प्रवशांचे प्राण वाचले. त्याला राष्ट्रपतींद्वारे सन्मान करण्यात आले व काही पैसे बक्षीस म्हणून देण्यात आले.
  • तात्पर्य: नेहमी जागरूक रहावे, कारण जागरूकतेमुळे धोकादायक प्रसंग टाळळे जाऊ शकतात.
Similar questions