Computer Science, asked by talhakhanb124, 4 months ago

कथालेखन
मुद्दयांच्या आधारे गोष्ट लिहा
मुद्दे -
दोधात शयन
यिन
एक
ससा
एक
कासव
शीर्षक
ससा हरतो
कासव जिंकते​

Answers

Answered by borhaderamchandra
3

Answer:

एकदा एक ससा कासवाला मोठ्या गर्वाने म्हणाला, अरे, माझ्याबरोबरीने धावणारा प्राणी कोण आहे ?

कासव तयार म्हणाले, 'मित्रा, तुला जर तुझ्या चपलतेबद्दल गर्व असेल तर चल मीच तुझ्याशी धावण्याची पैज लावतो, आपण दोघंही एकदम निघून त्या समोरच्या डोंगरापर्यंत जाऊ.

जर तिथे तू माझ्या अगोदर जाऊन पोहचलास तर मी तुला बक्षिस देईन, पण मी तुझ्या पूर्वी गेलो तर तू मला बक्षिस द्यायचं.'

सशाने ही गोष्ट कबूल केली. मग दोघेही एकदम तेथून निघाले.

परंतु थोड्याच वेळात सशाने कासवाला फारच मागे टाकले.

नंतर त्याने विचार केला, आपल्याला बरेच श्रम झाले आहेत, तेव्हा समोरच्या झाडाखाली आता थोडा वेळ झोपावे हे बरे.

झोपेतून उठेपर्यंत कासव जर थोडे पुढे गेले तर एका धावेत त्याला आपण मागे टाकू शकू.

असा विचार करून तो त्या झाडाच्या थंड सावलीत झोपला. इकडे कासव हळूहळू चालतच होते.

ते मध्ये न थांबता पैजेच्या ठिकाणी पोहचले व आपल्या चपलतेच्या घमेंडीत ससा त्या झाडाखालीच झोपून राहिला.

तात्पर्य

- एखाद्याची बुद्धी तीक्ष्ण असून तो जर आळशी असेल तर त्याच्याकडून फारसे काम होणार नाही. पण एखादा मंदबुद्धीचा जर सतत उद्योग करीत राहिल तर तो बरेच काम करूं शकेल.

Similar questions