India Languages, asked by Hiteshahire16, 2 months ago

कथा लेखन नमुना
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनने कथा पूर्ण करा
प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र, एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र
डबा खाणारे सच्चे सोबती, दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्दर आईबरोबर गावाला गेला,
आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते.
प्रकाशला अन्बरच्या भेटीची ओढ लागली होती, सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी
प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्बरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेन
चिठ्ठी वाचायला घेतली आणि....​

Answers

Answered by prathamshetty1978
5

Answer:

कथा लेखन नमुना

खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनने कथा पूर्ण करा

प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र, एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र

डबा खाणारे सच्चे सोबती, दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्दर आईबरोबर गावाला गेला,

आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते.

प्रकाशला अन्बरच्या भेटीची ओढ लागली होती, सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी

प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्बरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेन

चिठ्ठी वाचायला घेतली आणि....

Answered by mad210216
12

खरी मैत्री

Explanation:

  • कथेचा अपूर्ण भाग खालीलप्रमाणे आहे:
  • चीट्ठी वाचून प्रकाशला रडू आले. चिट्ठीत लिहिले होते की, "प्रकाश आता आपली कधी भेट होईल, हे मला माहीत नाही. मी इथे माझ्या मामाच्या गावी राहायला आलो आहे आणि मी आता परत तिथे येणार नाही. माझ्या पुढच्या शिक्षणासाठी आईकडे पैशे नाही आहेत, त्यामुळे मी इथे राहून माझ्या मामाला त्याच्या कामात मदत करेन. मला तुझी खूप आठवण येईल."
  • प्रकाशने सगळे काही त्याच्या आईला सांगितले व आईला विचारले, "आपण अन्वरची मदत नाही करू शकत का?" आई म्हणाली, "बाळा, आपल्याकडे इतके पैसे नाहीत की आपण अन्वरच्या शिक्षणाचा खर्च करू शकतो".
  • प्रकाशला सतत वाटत होते की अन्वरचे शिक्षण सुटायला नको होते. त्याने अन्वरला गावावरून परत आणायचे निश्चित केले. त्याने जवळच्या स्वयंसेवी संस्थांमध्ये पैशांच्या मदतीच्या अपेक्षेने चौकशी केली. परंतु, त्याला हवी तितकी मदत मिळाली नाही.
  • थोड्या दिवसांनी त्याची भेट एका भल्या सेठजीशी झाली. सेठजीने अन्वरच्या अभ्यासाचे खर्च उचलण्याचे ठरवले. हे ऐकून प्रकाश खूप खुश झाला.
  • त्याने अन्वरच्या आईला सेठजीचा निरोप दिला. आईने पुन्हा अन्वरला गावावरून बोलावले. प्रकाशला पाहून अन्वरने त्याला मिठी मारली.
  • तात्पर्य: खरा मित्र तोच असतो जो संकटाच्या वेळी मदत करतो.
Similar questions