(१) कथालेखन : पुढील मुद्दयांवरून गोष्ट तायर करा, शिर्षक द्याव तात्पर्य लिहा.. एक राजा -- त्याची प्रजा आळशी होती. त्यासाठी राजाची युक्ती-- रस्त्यात मोठा दगड ठेवतो त्याखाली सोन्याची नाणी असलेली पिशवी- अनेक लोक जाता पण दगड उचलत नाही- एक गरीब माणूस उचलतो लोकांना ते कळते ते उद्योगी बनतात तात्पर्य
Answers
Answer:
राजाची हुषारी
एक राज्य होते एका राजाचे ...तो राजा वयक्तिक कोणाला बोलू शकत नव्हता त्या राजाची प्रजाही खूप आळशी..परंतू त्याला लोकांना अद्दल घडवणे सोपे ... असेच एके दिवशी त्याला एक कल्पना आली नव्हते... की त्याने नेहमीप्रमाणे कुणासही काहीही सांगायचे नाही..लगेच त्या राजाला युक्तीने लढण्याचे ठरवले..त्यानंतर राजा रस्त्यामध्ये मोठा दगड ठेवून लोकांची परीक्षा घेण्याचे ठरवले यावर त्याला माहित होते लोक खूप आळशी... ते हा दगड बाजूला करणार नाहीत.. परंतू गरीब बेचारा अशक्त माणूस आला त्यालाही वाटले हा दगड बाजूला करावा.. त्याने विनंती केली की बाबांनो रे हा दगड घ्या बाजूला कोण त्याच ऐकेणाही...थोडावेळाने त्या गरीबानेच दगड बाजूला केला ह्यावर त्याली खाली..सोन्याची पिशवी सापडली आणि तो खुश झाला माणसे त्याचा हेवा करू लागले व त्यांना अद्दल घडल्याने लोक फार कामसू बनली....
आवडले तर brainlist मन्हून मार्क करा
★ कथालेखन :
- राजाची युक्ती
महाराज उदयसिंह आपल्या राज्याची सैर करत असताना त्यांना निदर्शनास आले की राज्यातील प्रजा दिवसेंदिवस आळशी होत चालली आहे. कुणीही जबाबदारीने काम करताना दिसत नव्हते. प्रजेचा आळशीपणा महाराज उदयसिंग च्या चिंतेचे कारण बनले. दिवसेंदिवस प्रजेचा आळशीपणा वाढत गेल्यास राज्याची प्रगती कशी होणार याची चिंता उदयसिंग मला सतावू लागली.
लोकांमध्ये काम करण्याची इच्छा जागृत व्हावी यासाठी त्याने एक युक्ती लढवली. महाराज उदयसिंह यांनी भर चौकामधील मुख्य रस्त्यामध्ये मोठा दगड आणून ठेवला. त्या दगडाखाली सोन्याची नाणी असलेली पिशवी सुद्धा ठेवली.
रस्त्यामध्ये दगड असल्यामुळे जाता येता लोकांना अडथळा निर्माण होऊ लागला. अनेकांच्या पायाला या दगडामुळे इजा होते पण कोणीही तो दगड उचलायला तयार होत नाही. हे सर्व एका गरीब माणसाच्या दृष्टीस येते. तो मोठा दगड बाजूला ठेवण्यासाठी उचलतो. त्याला ती पिशवी ज्यामध्ये सोन्याची नाणी होती ती मिळते. हे सर्व आजूबाजूला असलेल्या लोकांना दिसून येते. मग त्यांना पश्चाताप होतो की आपण हे काम आधीच का नाही केले. या प्रसंगामुळे सर्वांच्या लक्षात येते की काम केले तर आपल्याला यश धन आणि आयुष्यात जे काही पाहिजे असेल ते प्राप्त होईल याच विचारांमुळे सर्वजण उद्योगी बनतात.
तात्पर्य : जीवनामध्ये यशस्वी बनायचे असेल तर आळस सोडून प्रयत्नशील बनावे.