२) कथालेखन (प्रसंगावरून) (8) प्रसंग २ प्रसंग १ माणसे झाडे तोडायला येणार वनदेवतेने माणसांना शिक्षा करायचे ठरविले म्हणून झाडे घाबरली प्रसंग ३ प्रसंग ४ दुस-या दिवशी सर्व झाडे गवताएवढी झील होती माणसे पाण्यासाठी, सावलीसाठी वणवण भटकली माणसे निराश झाली त्यांना खूप पश्चाताप झाला. देवीला शरण गेली. देवीने समजावून सांगितले. in marathi
Answers
Answer:
i don't know Hindi sorry please make me brainlist and follow
Answer:
Explanation: कथालेखन (प्रसंगावरून) - एकदा एका जंगलात काही माणसे झाडे तोडायला येणार होती. माणसांचा संवाद ऐकून सर्व झाडे घाबरून गेली. त्यांना काही सुचेना. शेवटी झाडे वनदेवतेला शरण गेली. त्यांनी सर्व हकीकत वन दवतेला सांगितली. आता मात्र माणसाच्या स्वार्थी वृत्तीचा देवीला खूपच संताप आला. तिने माणसांना शिक्षा करायचे ठरविले. तिने सर्व मोठ्या-मोठ्या झाडांचे रूपांतर गवतामध्ये करून टाकले. आता माणसे पाण्यासाठी, सावलीसाठी वणवण भटकू लागली. त्यांना सावली, फळे. लाकूड मिळणे अशक्य झाले. माणूस एकदम वेडापिसा झाला. निराश झाला. त्याची ती अवस्था पाहून बिचारी झाडे घाबरून गेली. त्यांनी माणसाला त्याची चूक सांगितली. माणसांना खूप पश्चाताप झाला. ती देवीला शरण गेली. देवीने समजावून सांगितले. निसर्गातल्या प्रत्येक घटकाला स्वत:चे असे अस्तित्व आहे आणि प्रत्येकजण तितकाच महत्त्वाचा आहे. माणसांना देवीचे म्हणणे पटले. त्यांनी निसर्गाची माफी मागितली. झाडांनी पण गयावया केली. देवीने झाडांना पूर्ववत बनवले सर्वजण खूश झाले.