कथालेखन (८० ते ९० शब्द) खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. निशांत – आईविना वाढलेलं पोर वडिलांची मेहनत- मुलाचे पैसे उधळणे- पिझ्झा डिलिव्हरी पाहून धक्का- डोळे उघडले बाबांच्या कष्टाची किंमत
Answers
Answered by
17
कथा लेखन.
Explanation:
- कष्टाचे महत्व.
- एका गावात निशांत नावाचा मुलगा राहायचा. त्याची आई त्याच्या लहानपणी वारलेली.
- लहानपणापासूनच त्याच्या बाबाने निशांतला सांभाळले होते. बाबांनी दिवस रात्र मेहनत करून निशांतला लहानाचे मोठे केलेले.
- परंतु, निशांतला त्याच्या बाबांच्या मेहनतीचे कदर नव्हती. तो काहीच काम करत नव्हता, फक्त मित्रांसोबत फिरत राहायचा, पैशांची उधळण करायचा.
- त्याचा बाबा दिवसभर काम करून थोड़े आणखी पैशे कमवण्यासाठी पिझ्झा डिलिव्हरीचे काम करायचा. एक दिवशी मित्रांसोबत बाहेर फिरायला गेल्या असता, निशांतला त्याचे बाबा पिझ्झाची डिलिव्हरी करत असताना दिसले.
- त्यांना पाहून निशांतच्या डोळ्यात अश्रु आले. त्याला परिस्थितीची जाणीव झाली आणि बाबांच्या कष्टाची किंमत कळली. त्या दिवसापासून त्याच्या स्वभावात फार बदल आला आणि तो काम करू लागला.
- तात्पर्य: प्रत्येकाने आपल्या आई- बाबांच्या कष्टांचा आदर केला पाहिजे.
Similar questions