Hindi, asked by sofiyashaikh219, 2 months ago

कथालेखन (८० ते ९० शब्द)
खालील मुददयांच्या आधारे कथा लिहा
गावातील नदीला पूर-शेतकऱ्याचे घर उद्ध्वस्त-जीव पकत वाचला-शेतकरी पूर्णपणे
निराश-कोळ्याच्या जाळ्यावर नजर-आशा पुन्हा निर्माण​

Answers

Answered by mad210216
20

कथालेखन

Explanation:

"आशावादी विचाराचे महत्व"

  • एका गावात श्यामलाल नावाचा शेतकरी राहायचा. प्रचंड पावसामुळे त्या गावात पूर आले. पूर इतके भयंकर होते, की त्यामुळे गावकरांची घरं उध्वस्त झाली. श्यामलालचे घर सुद्धा पुरामुळे उध्वस्त झाले.
  • आपल्या घराची दशा पाहून श्यामलाल खूप निराश झाला होता. आता पुढे काय होईल? या विचाराने तो त्रस्त झालेला.
  • उध्वस्त झालेल्या घराबाहेर बसलेल्या श्यामलालची नजर समोरच्या भिंतीवर गेली. तिथे एक कोळी त्याचे जाळ विणत होता.
  • जाळ विणत असताना तो दोन तीन वेळा खाली पडला. परंतु, तो परत वर चढून जाळ विणायचा. शेवटी तो जाळ विणण्यात यशस्वी ठरला.
  • हे पाहून श्यामलालच्या मनात आशा निर्माण झाली. या कोळीसारखे आपण सुद्धा पुन्हा आपले घर बांधू शकतो असे त्याला वाटू लागले.
  • आपण खूप मेहनत करू आणि पुन्हा घर बांधू असे त्याने ठरवले.
  • तात्पर्य: जीवनात माणसाने कधीही आशा सोडू नये.
Similar questions