(२) कथालेखन (८० ते १०० शब्द)
(६)
खाली दिलेल्या मुद्द्यावरून कथा तयार करा. कथेला योग्य शीर्षक व तात्पर्य दया.
मुद्दे - श्रीमंत म्हातारा...... दोन नोकर कोंबडा आरवला की म्हातारा उठे ........ नोकरांना उठवून काम करायला सांगे.........
कोंबड्याला मारणे ... म्हाताऱ्याचे वेळीअवेळी उठणे ......... पहिल्यापेक्षा जास्त काम पश्चात्ताप ........ तात्पर्य,
........
17)
कplzz give the ans
Answers
वाईटातून चांगले......
आटपाट नावाचं एक गाव होत तिथे त्या गावातील माणसं सुखी व समाधानी होती... रोज सकाळी शेतात काम करून आपली पोट भारत असतं... त्या गावात विजयकुमार देशमुख नावाचा एक श्रीमंत म्हातारा राहायचा.. त्याच्याकडे विठू नावाचा एक कोंबडा होता.. त्याचबरोबर त्याच्याकडे दिनू आणि पिनू नावाचे दोन कामगार होते.... कोंबडा अरावला की विजयकुमार उठे....
आणि स्वतःसोबत नोकरांना ही उठावे व कामास लावे त्याच्या ह्या प्रवृत्ती मुळ कामगार जाम भडकले होते..... कोंबड्यांचे अरवणे यामुळे विजयकुमार संतापे व त्याला मारे... एक दिवस न झाल्याने व त्याच्या वाईट प्रवृत्ती मुले दिनू आणि पिनु काम सोडून निघून गेले....
कोंबड्याला मारल्यामुळे कोंबडा ही मरून पडला.. घरात कोणीच नसल्याने त्याची फार फजिती होवू लागली.. तो कधीही उठू लागला या मुळे त्याची प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होवू लागली.... त्यात नोकर काम सोडून निघून गेल्याने सगळी कामे त्यालाच करावी लागत... त्याने अनेकांना कामावर बोलावले पण एकही त्याच्याकडे टिकत नसे.. या मुळे त्याला फार पश्चाताप झाला..... व त्याने दिनू व पिनू ची माफी मागून कामावर बोलावले.....
तात्पर्य:कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये...
Answer:
आजोबा आणि कोंबडा
Explanation:
एका गावात धोंडीराम पाटील नावाचे एक आजोबा राहत होते. आजोबांचे मुलं बाहेर गावी नोकरीला होते व आजोबांच्या पत्नीला काही वर्षांपूर्वी देवाज्ञा झाली होती. अशा सगळ्या कारणांमुळे आजोबा गावी एकटेच राहत होते. आजोबांकडे वडिलोपार्जित संपत्ती होती आणि आजोबांनी सुद्धा कष्ट करून त्यात भर घातली होती.
आजोबांचे शरीर थकले होते. त्यामुळे त्यांचा सांभाळ करायला व घराची इतर कामे करायला आजोबांनी दोन नोकर ठेवले होते. तसेच आजोबांना लहानपणापासूनच लवकर उठण्याची सवय होती परंतु अलीकडे त्यांना लवकर जाग येत नसल्यामुळे त्यांनी एक कोंबडा पाळला होता.
दररोज पहाटे पाच वाजता कोंबडा आरवत असे व ते ऐकून आजोबा उठायचे आणि त्यांच्या सोबतच नोकरांना सुद्धा उठवायचे. हा नित्यक्रम मागील एक-दीड वर्षापासून सतत चालू होता.
आजोबांचे लवकर उठणे हे त्यांच्या नोकरांना पसंत नव्हते. नोकर एकमेकांशी बोलताना म्हणायचे की एवढ्या भल्या पहाटे उठण्याची गरज काय. आपण जरा उशिरा उठलो तरी सर्व कामे आपण करू शकतो. परंतु हे सगळं आजोबांना सांगण्याची नोकरांची हिंमत नव्हती. सततच्या लवकर उठल्यामुळे दोघेही नोकर कंटाळले होते. आजोबा लवकर उठू नये यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करू लागले. परंतु दररोज पहाटे कोंबडा आरवला की आजोबा लगेच उठत असत.
शेवटी नोकरांना हे कळून चुकले की जोपर्यंत हा कोंबडा आरवत राहील तोपर्यंत आजोबा पहाटे उठत राहतील आणि आपली पहाटेची साखरझोप मोडत राहतील.
म्हणून दोघं नोकरांनी याच्यावर रामबाण उपाय शोधण्याचे ठरवले. यातूनच एकाच्या मनात आले की आपण जर हा कोंबडा मारून टाकला तर आजोबा सकाळी लवकर उठणार नाहीत आणि आपली साखर झोप मोडणार नाही. एका नोकराचे हे मत दुसऱ्या नोकराला ही पटले.
एके दिवशी रात्री आजोबा झोपल्यावर दोन्ही नोकरांनी कोंबड्याला गुपचुप पकडून मारून टाकले आणि ते झोपी गेले. त्यादिवशी पहाटे कोंबडा आरवला नाही म्हणून आजोबांना जाग आली नाही. दोघे नोकर कमालीचे खुश झाले.
परंतु दुसर्या दिवसापासून आजोबा रात्री कधीही उठू लागले व नोकरांना ही उठवू लागले. आजोबांना वाटायचे कि पहाट झाली म्हणून त्यांना जेव्हा जाग येईल तेव्हा ते नोकरांना उठवायला लागले. कधी कधी तर आजोबा एकाच रात्री नोकरांना चार पाच वेळेस उठवायला लागले.
यावरून दोन्ही नोकरांना कडून चुकले की त्यांची योजना चुकीची होती व ती चूक त्यांच्याच अंगाशी आली होती आणि ते आता त्याच चुकीचे फळ भोगत होते.
:
तात्पर्य: दुसऱ्यांसाठी वाईट केले तर तसेच आपल्या सोबत देखील होते.