India Languages, asked by shantipatel2011, 6 months ago

*कथालेखन*
दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ या
शीर्षकावर आधारीत गोष्ट
बनवा.pls it's urgent ​

Answers

Answered by Saniyashaikh482
2

Answer:

एका सिंहाने व एका अस्वलाने एकाच वेळी झडप घालून एका हरणाला मारले. आता हे हरण कोणी घ्यायचे यावरून दोघांत चांगले जोरदार भांडण जुंपले. कोणीही कमीपणा घ्यायला तयार नव्हता. दोघेही चांगले रक्तबंबाळ झाले होते. मेलेले हरण जमिनीवर पडले होते. दोघेही मारामारी करीत त्या मृत हरण्यापासून थोडे दूर गेले होते.एका कोल्ह्याने हे सर्व पाहिले. दोघेही एकमेकांवर हल्ले करीत असलेले पाहून तो कोल्हा सरळ तिथे गेला आणि त्याने त्या दोघांच्या समोर हरणाला उचलून त्यांच्यापासून दूरवर नेऊन आपली भूक भागवली. दोघेही बराच वेळ एकमेकांशी झुंजत होते. नंतर दोघेही जमिनीवर निपचित पडले. बर्‍याच वेळानंतर आपण मारलेल्या हरणाची त्यांना आठवण झाली, परंतु ते तिथे नव्हते. कोल्होबाने त्याचा कधीच फडशा पाडला होता.

Explanation:

Similar questions