२) कथालेखन
दिलेल्या कथाबीजाववरून कथा लिहा. कथेला शीर्षक दया.
दोन मित्रांच्या मैत्रीची कसोटी पाहणारा प्रसंग व त्यातून होणाऱ्या खऱ्या मैत्रीची जाणीव.
Answers
Answer:
फडणवीस, नागपूर
ज्या व्यक्तीच्या डोक्यात मैत्रीदिनाची कल्पना प्रथम आली त्याचे आपल्या सगळ्यांवरच अनंत उपकार आहेत. खर म्हणजे, मैत्रीला एका विशिष्ट दिवशी साजरा करण्याचे कारणच नाही. पण तरीही या दिवसाच्या निमित्ताने तसे होत असेल तर त्यात वाईटही काही नाही.
आयुष्यात असंख्य वळणावर परमेश्वर आपल्याला एक सच्चा साथीदार पाठवत असतोच. आपण फ़क्त त्याला ओळखायचे असते. आजुबाजुला असंख्य व्यक्ती असूनसुद्धा एका विशिष्ट व्यक्तीकडे आकर्षित होतो व हेच आकर्षण पुढे मैत्रीत रुपांतरीत होते. मनाला एक सुंदर, अनामिक ओढ लावणारं नातं म्हणजे मैत्री. मैत्रीपूर्ण नातं कधीही विसरता येत नाही. ते कायम सोबत असतेच.
मैत्री हा शब्दच आल्हाददायक आणि आनंद देणारा आहे. परमेश्वरानं मैत्री हे नातं असं काही निर्माण केलं आहे की त्याला कुठल्याच पारड्यात तोलता येणार नाही. निखळ मैत्री आणि त्यातून मिळणारा आनंद याचंच एक स्वतंत्र वजन असतं. मुळात मैत्रीला कुठलीही बंधनं नाहीच. ना जातीचे, ना वयाचे, ना गरीबी-श्रीमंतीचे. दोन समविचारी एकत्र आले की मैत्री तिथे ओघानेच येते. सुखदुःखाच्या प्रसंगी एकत्र आलं की मैत्री अधिक दृढ होत जाते. या मैत्रीत सदैव मायेचा ओलावा असतो. विचारपूस, काळजी, प्रसंगी भांडण, अबोला यामुळे मैत्रीत परिपक्वता येते.
तसं पाहिलं तर खरी मैत्री कधीच सिद्ध करावी लागत नाही. प्रसंगोपात एकत्र आलेल्या दोन व्यक्तींमध्ये कालानुरूप मैत्री अधिक पक्की होत जाते. विचारांचे आदान-प्रदान, एकमेकांची सुखदुःखं जाणून त्यावर केलेले चिंतन हेच मैत्रीचे भांडवल. मानवी आयुष्यातील सगळ्या नात्यांत कायम प्रफुल्लित राहील, असं नातं म्हणजे मैत्री.
एकमेकांची भेट हे मैत्रीचं मुख्य सूत्र आहे, असं आपण म्हणू शकतो. पण आज प्रत्येकाचे व्यापताप बघता ते सहज शक्य नाही. सोशल मीडियामुळे मैत्रीचे संदर्भही बदलू लागले आहेत. पूर्वी आधी भेट व्हायची आणि नंतर मैत्री. आता सोशल मीडियामुळे आधी विचारांची देवाणघेवाण होते, ते पटले तर मैत्री आणि नंतर प्रत्यक्ष भेट! पण त्यातून जे आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो तो खरच स्वर्गीय असतो. मैत्रीला कधीही कुठलीही बंधन नसतात. मैत्रीत राग हवा, प्रसंगी भांडण ही हवे, पण प्रत्येक भेटीत प्रेम आणि आत्मियता असावी.
विश्वासाच्या आधारावरच मैत्री कायम राहते. भेटी होऊ शकल्या नाहीत तरी एकमेकांशी बोलत राहिल्याने गैरसमज टळतात. बऱ्याचदा काही गोष्टी बोलायच्या राहून जातात आणि त्या मग आठवणींच्या रूपात त्या सोबत असतात. या आठवणींना त्या मैत्रीतल्या धाग्यात बांधून ठेवण्यासाठी एकमेकांशी संवाद असायलाच हवा.
आयुष्यात असंख्य लोक जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर भेटत असतात. त्यातील अनेकांशी ताटातूटही होते. पण मैत्री झाल्यानंतर ते संबंध कायम राहतात आणि ताजेसुद्धा. कमळाच्या फुलातील परागकण खाण्यासाठी भुंगा ज्याप्रमाणे त्याच्या आजुबाजुच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करतो, त्याचप्रमाणे आपल्यातील दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून आपल्यात चांगला पकदल घडवायला मदत करतात ते मित्र आणि त्यांचा मैत्रभाव.
आजच्या मैत्रीदिनाच्या निमित्ताने असंख्य मित्र व मैत्रिणींना मनापासून शुभेच्छा!

Explanation: