कथालेखन- दिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी!............
Answers
एकत्र आलेले पाहून
आजी तृप्त झाली होती. एकमेकांशी रक्ताने व मनाने जोडलेल्या तीन पिढ्या एकत्र जमल्या
होत्या. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी हास्यविनोदात, मनमोकळ्या गप्पांत
सारेजण दंग होते आणि अगदी अचानक या गप्पांत एक अनोळखी आवाज ऐकू आला.
अत्यंत मिश्कील डोळे, ज्यांच्यात एक अवखळ, बालकांना शोभावी अशी भुर्या रंगाची छटा होती, त्यांत मागच्या समुद्राच्या लाटांचे प्रतिबिंब पडलेले होते. पुरूष असूनही राकटपणापेक्षा त्याच्यात बॉयीश लूक्स अधिक होते. आणि चेहर्यावर कायम भुरळ पाडणारे स्मितहास्य! ज्यावर विश्वास ठेवायला कुणीही क्षणात तयार होईल! रेमंड्सच्या त्या ग्रे ब्लेझरमध्ये त्याचा गुलाबी गोरा रंग आता लालसर होऊ लागला होता. फॉस्टरचा टिन घोट घोट घशात उतरवत 'बघ कसे तुला चिडवले' असा लूक चेहर्यावर ठेवून जतीन खन्ना समोर बसलेल्या मोना गुप्ताकडे मिश्कीलपणे पाहात होता. पण त्याला अपेक्षित तो परिणाम झाला नाही. लहानपणी ती चिडायची आणि चिडून काहीतरी बडबडायची. पण त्या गोष्टीला आता वीस वर्षे झाली होती. त्यावेळेस ती फक्त पाच वर्षांची होती. आता पंचवीस! आणि जतीन तीस!
अचानकच, जतीनचा आत्मविश्वास किंचित डळमळावा असं काहीसं ठाम प्रकारचं स्मितहास्य मोनाच्या चेहर्यावर आलं! डोळ्यात मात्र त्या हास्याची भावना जेमतेमच उतरली होती. कारण डोळे काहीश्या निर्धाराने अधिक व्यापलेले होते.
आणि गुप्ता हेलिक्स लिमिटेडच्या अकाउंटमध्ये सही करून मोना उठली तसा जतीन यंत्रवत चालत तिच्या कारमध्ये तिच्या शेजारी जाऊन बसला