कथा तयार करा ससा - कासव-शर्यत-विजय
Answers
Answer:
Menu
ससा आणि कासवाची शर्यत गोष्ट लिहिलेली | Rabbit and tortoise story in marathi
byMohit patil
Rabbit and tortoise story in marathi: मित्रहो या लेखात ससा आणि कासवाची गोष्ट देण्यात आली आहे. बहुतेक मित्रांना sasa ani kasav यांची marathi story आधीपासूनच माहीत असेल, कारण इयत्ता दुसरीच्या इंग्रजी पुस्तकात देखील ही कथा टाकण्यात आली आहे.
बरं असू द्या, आजच्या या लेखात ही ससा आणि कासवाची गोष्ट लेखी रूपात दिली आहे. ह्या गोष्टीला एकदा नक्की वाचा आणि यातून योग्य बोध मिळवा.
ससा आणि कासव यांची शर्यत मराठी गोष्ट | Rabbit and Tortoise story in marathi written.
एका रानात ससा व कासव हे दोन्ही मित्र राहत असत. एकदा दोघीजणी सोबत खेळत होते. खेळता-खेळता ससा कासवाच्या संथ वेगाचा उपहास करू लागला. सशाला त्याच्या वेगावर गर्व झाला व तो हळूवार गतीने चालणाऱ्या कासवाची खिल्ली उडवू लागला.
कासव शांतपणे त्याला म्हणाले, "मी हळुवार चालतो तर काय झालं, जर आपल्या दोघांमध्ये धावण्याची शर्यत लागली तर मी तुला हरवू शकतो." कासवाचे हे बोलणे ऐकून सशाला आश्चर्य वाटले. व तो त्याला म्हणाला, "काय विनोद करतोय."
"विनोद नाही, मी गंभीर आहे. आणि मी खरोखर तुला हरवू शकतो" कासव म्हणाले. कासवाचे बोलणे ऐकून ससा हसत म्हणाला, "चल मग होऊन जाये दौड."
धावण्याच्या शर्यतीचा मार्ग निश्चित करण्यात आला. जेव्हा जंगलातील दुसऱ्या प्राणी मित्रांना या शर्यती बद्दल कळाले, तेव्हा ते सर्वजण ही दौड पाहण्यासाठी एकत्रित झाले.
दुसऱ्यादिवशी सकाळी सर्वजण जमले. नदीच्या किनार्यावर असलेल्या एका पर्वताला शर्यतीचे शेवटचे टोक निश्चित करण्यात आले व सांगण्यात आले की जो सर्वात आधी पर्वतावर पोहचेल तो विजयी होईल.
दोघीजणी शर्यतीच्या रेषेवर उभे राहिले. एक, दोन, तीन बोलून शर्यत सुरू झाली. डोळ्याची पापणी पडेल तेवढ्यात ससा तेथून पळाला. कासव मात्र हळू हळू एक एक पाऊल टाकू लागले.
जवळपास अर्ध्या पेक्षा जास्त अंतर पार केल्यावर सशाने मागे वळून पाहिले. पाहतो तर काय कासव दूरदूरपर्यंत दिसत नव्हते. इतक्यात त्याला नदीच्या बाजूला उगलेले हिरवे टवटवीत गवत आणि गाजरे दिसली. सशाने गवत आणि गाजरावर ताव मारला. पोटभर खाल्ल्यानंतर त्याने नदीतील थंडगार पाणी पिले.
त्याने विचार केला की कासव तर अजून फार दूर आहे. मी या झाडाखाली थोडा वेळ आराम करतो जसे कासव जवळ येईल, तसा मी वेगाने पळत जाऊन शर्यत जिंकून घेईल.
नदीवरून वाहणारा थंडगार वारा आणि झाडाच्या सावलीखाली सशाला गाढ झोप लागली. तो जोरजोरात घोरायला लागला.
इकडे दुसरीकडे कासव संथ गतीने का होईना परंतु न थांबता चालत होते. ससा खूप वेळ झोपलेला राहिला.
जेव्हा सशाला जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती. हळू हळू अंधार पडू लागले होते. त्याला शर्यतीची आठवण झाली आणि तो तुफान वेगाने पर्वताकडे पळत सुटला. परंतु पर्वतावर पोहचून पाहतो तर काय कासव आधीपासूनच तेथे उपस्थित होते.
ससा शर्यत हरला होता. त्याला आपली चूक लक्षात आली व तो आपला मित्र कासवाची क्षमा मागत म्हणाला, "मित्रा मला माझ्या वेगाचा अभिमान झाला होता, आणि म्हणून मी तुला तुच्छ समजायला लागलो होतो. परंतु आता माझी चूक मला लक्षात आली आहे. तू न थांबता आपल्या ध्येयाकडे चालत राहीला आणि म्हणून तो विजयी देखील झालास. या जगात जो थांबला तो संपला म्हणून हळुवार का होईना आपल्य मार्गाच्या दिशेने पाऊल टाकत राहायला हवेत.
तात्पर्य:
आपल्या क्षमतेचा अभिमान बाळगू नये.
यश प्राप्तीसाठी न थांबता निरंतर प्रयत्न करीत रहा.
तर मित्रांनो ही होती छानशी ससा आणि कासवाची गोष्ट लेखी. आशा करतो की तुम्ही या मराठी बोधकथेतून योग्य बोध घेतला असेल. या कथेला आपल्या इतर मित्रांसोबतही शेअर करा. धन्यवाद...
Explanation: