कठपुतळीचे बाहुल्यांचे प्रकार
Answers
Answer:
Explanation:
कळसूत्री बाहुल्यांचा खेळ : बाहुल्यांच्या हालचालींतून एखादा नाट्य-प्रसंग प्रेक्षकांसमोर उभा करण्याचा एक प्राचीन काळापासून चालत आलेला खेळ. या खेळात सूत्राच्या आधारे बाहुल्यांच्या हालचालींचे नियमन करणारा सूत्रधार स्वत: अदृश्य राहून या बाहुल्याच जणू स्वयंप्रेरणेने हालचाल करीत आहेत, असे भासवितो. कळसूत्री बाहुल्यांचे हे नाट्य सूत्रधाराच्या कल्पनेवर अवलंबून असते.
आ. १
आ. १
हे बाहुली-नाट्य असल्याने यातील प्रसंग कोठेही म्हणजे घरात, आकाशात, झाडावर अगर पाण्याखाली घडलेले दाखविता येतात. तद्वतच पशूंचे बोलणे, झाडांचे चालणे, व्यंगचित्रांतील आकारवैचित्र्य, अघटित घटना यांसारख्या क्लृप्त्यांचा वापर यात विसंगत वाटत नाही. लहान रंगमंच, प्रकाश व ध्वनी यांचा सूचक उपयोग अशा वैशिष्ट्यांमुळे या खेळाचा अनेक दृष्टींनी उपयोग केला जातो. आज पाश्चात्त्य देशांत आणि विशेषत: अमेरिकेत कळसूत्री बाहुली-नाट्य अतिशयच प्रगतावस्थेला पोहोचले आहे. या बाहुली-नाट्याचा उपयोग मनोरंजनाबरोबरच शिक्षण आणि प्रसाराचे साधन म्हणून सर्वत्र होऊ लागला आहे.
रचनेच्या दृष्टीने कळसूत्री बाहुल्यांचे चार मुख्य प्रकार आहेत :
(१) छाया-बाहुली : ही रंगीत कागद, कचकडे, पातळ कातडे अशा मितपारदर्शक पदार्थांपासून तयार करतात. दक्षिण भारत, जावा, चीन, जपान येथे कातड्याच्या बाहुल्यांचे छाया-नाट्य प्रचारात आहे. यासाठी प्रथम कातडे दोन्ही बाजूंनी घासून स्वच्छ करतात. त्याचे पातळ थर एकमेकांपासून अलग करून धड, डोळे, अवयव असे सुटे भाग कापतात. रंग व छिद्रे यांच्या साहाय्याने कपडे, दागिने इ. दाखवितात. पांढरा पडदा व प्रखर दिवा यांच्यामध्ये व पडद्याला लावून काड्यांच्या साहाय्याने बाहुलीची हालचाल करतात. पडद्यांवर हालते-चालते रंगीत चित्र दिसते. याला संगीत व संभाषणांची जोड देऊन कळसूत्री-नाट्य तयार होते. मद्रासच्या ‘सेंट्रल लेदर रिसर्च इन्सिस्ट्यूट’मध्ये या तंत्राचे संशोधन चालू आहे.
आ. ३
आ. ३
(२) हात-बाहुली : हातमोज्याप्रमाणे हाताच्या पंजावर बसवून रंगमंचाच्या मागे उभे राहून हिची हालचाल करता येते. कागदाचा रांधा, कापड अशा हलक्या पदार्थांपासून बाहुलीचे डोळे व पंजे तयार करून मऊ कापडाच्या तीन तोंडी पिशवीला ते घट्ट बसविण्यात येतात. या पिशवीवरून बाहुलीला योग्य असे कपडे व दागिने घालता येतात (आ. १, २,३, ४).
आ. २
आ. २
(३) काठी-बाहुली : या प्रकारात बाहुलीचे डोके एका पातळ काडीवर बसवलेले असते. दोन्ही पंजांना तशाच पातळ काड्या लावलेल्या असतात. एका हाताने डोक्याची काडी आणि दुसऱ्याने बाहुलीच्या हातांच्या दोन काड्या यांची हालचाल करून बाहुली चालविता येते. चालविणारा रंगमंचाच्या मागे व खाली उभा असतो. अधिक काड्या वापरून पाय, तोंड यांची हालचाल करता येते. माणसाच्या आकाराच्या बाहुल्या करून चार माणसांनी त्या चालविण्याचा प्रकार जपानमध्ये आहे (आ. ५).
आ. ४
आ. ४
(४) सूत्र-बाहुली : ही खरी कळसूत्री बाहूली. रंगमंचाच्या मागे व वर उभे राहून ही चालवावी लागते. छाती, पोट, कंबर, डोके, हात, पाय असे सुटे भाग तयार करून हालत्या सांध्यांनी ते जोडतात. योग्य ठिकाणी दोरे बांधून बाहुलीची हवी तशी हालचाल करता येते. या हालचाली खऱ्या प्राण्यांच्या हालचालींशी स्पर्धा करू शकतात. इतकेच नव्हे, तर सत्यसृष्टीत न घडणाऱ्याही हालचाली यांच्याकडून करून घेता येतात. एका दोऱ्यापासून अनेक दोरे लावलेल्या बाहुल्या वापरात आहेत. भारतातील परंपरागत पद्धतींत या दोऱ्यांच्या टोकांना आंगठ्या बसवून कलाकार त्या आपल्या बोटांत घालतो. बोटांच्या हालचालीने बाहुली चालविता येते. आधुनिक तंत्रामध्ये हे दोरे एका ‘चलन-पट्टीला’ बांधतात. उभी व आडवी असे चलन-पट्टीचे मुख्य दोन प्रकार आहेत. बाहुलीपासून येणारे दोरे चलन-पट्टीला बांधून पट्टीच्या विविध हालचालींप्रमाणे बाहुली रंगमंचावर काम करते. नेहमीच्या सर्व हालचालींशिवाय नृत्य, सर्कस यांतील हालचाली हिला सफाईने करता येतात. या प्रकारात प्राण्यांच्या बाहुल्याही वापरतात (आ. ६, ७, ८, ९, १०, ११).
आ. ५
आ. ५
म्हैसूरकडे सूत्र-बाहुली व काठ-बाहुली यांच्या संयोगाने होणारा एक प्रकार प्रचारात आहे. त्यात कलाकाराच्या डोक्याला एक पट्टा बांधतात. बाहुलीच्या खांद्यापासून अगर डोक्यापासून निघणारे दोन दोरे या पट्ट्याच्या दोन बाजूंस लावतात. बाहुलीच्या हाताला पातळ काड्या लावून कलाकार त्या हालवतो. प्रेक्षकांना या काड्या अगर दोरे दिसत नाहीत. कलाकार व बाहुली यांच्यामध्ये पडदा असतो (आ. १२).
आ. ६
आ. ६
अवयवांच्या नेहमीच्या सर्व हालचाली सूत्र-बाहुल्या सफाईने करतातच परंतु बोलताना बाहुलीच्या तोंडाची, बुब्बुळांची, पापण्यांची आणि भुवयांच्याही हालचाली करता येतात (आ १३). बाहुली नाट्याच्या मर्यादा केवळ कलाकाराच्या कल्पनाशक्तीच्या मर्यादेवर अवलंबून असतात.
आ. ७
आ. ७