कविड १९ निबंध लेखन in marathi
Answers
जगानं एका मोठ्या जागतिक आरोग्य संकटासाठी सज्ज राहावं असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.
कोरोना विषाणू लगेचच जागतिक साथ ठरेल असं नाही, पण देशांनी त्यासाठी तयार रहावं असं WHO ने म्हटलंय.
कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण जगातील विविध देशांमध्येही आढळू लागल्यानं चिंता वाढलीय. त्यामुळेच कोरोना विषाणूचं जागतिक साथीमध्ये रुपांतर होण्याची भीती वाढलीय.
यातील बहुतांश संसर्ग चीनमध्ये झाला असला, तरी दक्षिण कोरिया, इटली आणि इराण यांसारखी इतर राष्ट्रही या विषाणूशी झगडत आहेत. या विषाणूमुळे 'कोव्हिड-19' हा श्वसनविकार होतो.
कोरोना विषाणूमुळे बळावतोय 'सायनोफोबिया'
कोरोना विषाणूने घेतला अनेक नामवंतांचा बळी
एखादा संसर्गजन्य रोग जगातील विविध भागांमध्ये व्यक्ती-व्यक्ती स्तरावर सहजरित्या पसरू लागतो तेव्हा जागतिक साथ पसरल्याचं म्हटलं जातं.चीनमध्ये गेल्या वर्षी हा विषाणू उद्भवला आणि तिथे आत्तापर्यंत सुमारे 77 हजार लोकांना याची लागण झाली असून जवळपास 2600 लोकांचा या आजारात मृत्यू झाला आहे.
सव्वीस देशांमध्ये या विषाणूची लागण झालेले 1200 हून अधिक रुग्ण आढळले असून 20 हून अधिक जणांचा यात मृत्यू झाला आहे. या आजाराने सोमवारी इटलीत चौथा बळी घेतला.कोव्हिड-19ने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण एक टक्क्यापासून दोन टक्क्यांपर्यंत असल्याचं दिसत असलं, तरी प्रत्यक्षातील मृत्युदर अजून समजलेला नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
इराक, अफगाणिस्तान, कुवेत आणि बहारीन या देशांमध्येही कोरोना विषाणूची लागण झालेले पहिले रुग्ण सोमवारी आढळले; हे सर्व लोक इराणहून आले होते.
या विषाणूला आळा घालण्याची संधी 'अंधुक' होत चालली आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख तेद्रोस अदहानम घेब्रेयेसस यांनी दिला.