Hindi, asked by reddykrishna171, 9 months ago

कवी कुसुमाग्रज जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस​

Answers

Answered by anmol05200
18

Explanation:

✨✨मराठी भाषा गौरव दिन' व 'राजभाषा मराठी दिन'✨✨

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. 'मराठी भाषा गौरव दिन' दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी २०१३ रोजी घेण्यात आला.✨✨✨✨✨✨✨✨

✨✨✨✨✨✨✨✨✨✨

'राजभाषा मराठी दिन' हा १ मे रोजी साजरा करण्यात येतो. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला.म्हणून १९९७ पासून १ मे हा दिवस 'राजभाषा मराठी दिन'म्हणून साजरा करण्यात यावा असा शासनाने निर्णय घेतला.दिनांक १० एप्रिल १९९७ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

please follow me ❤️❤️

Similar questions