कवितेचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा
Answers
Answer:
ch be no vr mi vrti veloce
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
मुलाने शाळेत शिकण्यास सुरुवात केल्यापासून ते शिक्षण प्रवास पूर्ण होईपर्यंत कितीतरी शिक्षक त्याला प्रत्येक वळणावर भेटतात. ते सतत आपणास वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान, मूल्य, आदर्शाची शिकवण देतात. त्यामुळे आपण माणूस म्हणून आकारास येतो. गुरूच्या शिकवणीतून आपल्या अंगी सद्गुण येतात. याच सद्गुणांची शिदोरी घेऊन, तोच ज्ञानरूपी वसा घेऊन आम्ही हा वारसा पुढे दुसऱ्या पिढीपर्यंत चालवू (घेऊन जाऊ) असे कवी सांगतात.
पिता-बंधु-स्नेही तुम्ही माउली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य अम्हां दिला कवडसा!
तुम्हीच आमचे पिता (वडील), बंधु (भाऊ), स्नेही (मित्र) आहात. तुम्ही आमची माऊली (आई) आहात. तुम्हीच आमच्या जीवनातील कल्पवृक्षाखालील सावलीप्रमाणे आहात. तुम्हीच ज्ञानरूपी सूर्य बनून आम्हांस ज्ञानाचा कवडसा (झरोका) दिला आहे.
जिथे काल अंकुर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा!
जिथे काल जमिनीतील बीजाला अंकुर फुटले तिथे आज |अंकुराची वेल होऊन त्यावर फुले फुलेली आहेत. त्याचप्रमाणे ज्ञानरूपी वृक्षालासुद्धा ज्ञानाची फळे लागून तो फलद्रूप व्हावा.
शिकू धीरता, शूरता, बीरता
धरू थोर विधेसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा।
गुरूने दिलेल्या ज्ञानाच्या शिकवणूकीतून आपण सारे संयम, धाडस, पराक्रम शिकूया. थोर ज्ञानप्राप्तीने आपल्यामध्ये कशाप्रकारे नम्रता आणता येईल हा एकच ध्यास आपल्या मनाला लागला पाहिजे.
जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा!
जरी कोणी दुष्ट असतील, त्यांना शासन (दंडीत) करू. जे कोणी गुणी आहेत, सज्जन आहेत, त्यांचेच पालन (रक्षण) करू. हाच पक्का विचार आमच्या सर्वांच्या मनात आहे.
तुझी त्याग-सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ति राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा!
हे पुण्यवंता, भल्या (ज्ञानी) माणसा, अशाप्रकारे तुम्ही केलेला त्याग, तुमची सेवा शेवटी आमच्या रूपाने फळाला येईल. तुमचा नावलौकिक, कीर्ति दाही दिशांना अबाधित राहिल.
आम्ही चालवू हा पुढे वारसा Summary in Marathi
Explanation:
mark my answer in brainlist plz