कवितेत कोणत्या चांगल्या गोष्टी सांगितल्या
आहेत
-0
तापीकाठची चिकणमाती ओटा तरी बांध ग बाई
असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई,
अस जात चांगल तर सीजी तरी दळ ग बाई
अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई
असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई
असा शेला चांगला तर भाऊराया भेट ग बाई
असा भाऊ चांगला तर दरी रथ आणील गबाई
असा रथ चांगला तर नंदी तर जुपिन ग बाई
असा नंदी चांगला तर माहेराला जाऊग बाई
असं माहेर चांगले तर धिगामस्ती करू ग बाई.
Answers
Answer:
लहान मुलांसाठी पंचतंत्र आणि इसापनीतीच्या बोध आणि उपदेश देणाऱ्या छान-छान गोष्टी इथे वाचा. जर आपल्याला या गोष्टी आवडल्या तर खालील शेअर बटन वापरून तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला देखील या गोष्टी पाठवू शकता.
Answer:
कवी सदाशिव माली यांच्या माहेर या कवितेतील या ओळी आहेत. माहेर या कवितेत कवींनी सासर वाशिनीच्या माहेर विषयी असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रत्येक काम करत असताना त्या स्त्रीला तिच्या माहेरची आठवण येत असते. ती म्हणते नदी काठची चिकन माती आणून मी अोटा बांधीन आणि त्या सुंदर अशा ओट्यावर गहू दळण्यासाठी जात मांडीन.
पीठ दळत असताना तिला तिच्या माहेरची आठवण येते. ती म्हणते मला माझा भाऊ रथ घेऊन घ्यायला येईल. मी त्याच्यासाठी दळलेल्या पिठाचे लाडू बांधीन. माहेरला जाऊन तिला पूना लहानपणा सारखी दंगामस्ती करायची आहे
अशाप्रकारे कवींनी तिच्या मनातील भाव व्यक्त केलेले आहेत.