कवितेतून व्यक्त झालेली ‘महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता’ हा विचार स्पष्ट करा.
Answers
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "महाराष्टारावरूनी ताक ओवाळून काया" या कवितेतील आहे. या कवितेचे कवी अण्णाभाऊ साठे आहेत. आपल्या ओघवत्या लोकभाषेतून हि काव्यरचना कवींनी केली आहे. यामधून त्यांचे आपले महाराष्ट्राच्या मराठी मातीवर असणारे प्रेम शब्दाशब्दातून दिसते.
★ महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता.
उत्तर- महाराष्ट्र हा आपल्यासाठी मंदिरासारखा आहे. महाराष्ट्राची यशोगाथा नेहमी उंचावत आहे. अनेक गड किल्ल्यांची पोवाडे गायली जात आहेत. ही मायभूमी शूरवीरांची, धाडसी शासनकर्त्यांची आहे. स्वातंत्र्याची शपथ घेऊन महाराष्ट्राची लढण्याची, जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी या महाराष्ट्रावरून आपली काया ओवाळून टाक अशी कृतज्ञता या काव्यातून व्यक्त झाली आहे.
धन्यवाद...
महाराष्ट्र हे मंदिर आहे, त्याच्या पुढे यशाची ज्योत पाझळते. महाराष्ट्राची धरती सोनं पिकावणारी आहे आणि वर निळ्या आकाशाची छाया आहे. गडकिल्ले महाराष्ट्रभूमीचे पोवाडे गातात. रथीमहारथींनी तिला भूषविले आहे. अरबी समुद्र जिच्या चरणी लीन आहे. महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्यांचा, साधुसंतांचा, शाहिरांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, त्यागांचा, सामर्थ्याचा व धुरंधर शिवरायांचा आहे. या प्रिया महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलाया व त्यावर जीवन कुर्बान करायला मी तयार आहे. अशा प्रकारे कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झाली आहे.