(२) कविता वाचून सूचनेनुसार कृती करा.
(अ) संकल्पना स्पष्ट करा.
(१) भाकरीचा चंद्र (२) कलम झालेले हात
Answers
Answer:
भाकरीचा चंद्र ही संकल्पना कवी नारायण सुर्वे यांच्या 'दोन दिवस' या कवितेतील आहे. माणसाच्या आयुष्यात किती अडचणी येतात, किती समस्या येतात आणि त्या समस्या सोडत असताना किती त्रास सहन करावा लागतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे दोन दिवस ही कविता.
कवी म्हणतो, आकाशात चंद्र येत राहतो, दिवस जात राहतात, परंतु भाकरीचा चंद्र शोधण्यामध्ये जिंदगी बर्बाद होते. पोटाची खळगी भरण्यासाठी भाकरीची गरज असते. आकाशात जरी चंद्र दररोज दिसत असला तरी त्या चंद्रा सारखी दिसणारी भाकरी दररोज पोटाला मिळेल याची शाश्वती नसते. त्या भाकरीसाठी मनुष्याला पूर्ण आयुष्य खर्च करावे लागते असे कवी म्हणतो.
कलम झालेले हात-
कलम झालेले हात म्हणजे आयुष्यामध्ये दारिद्रय एवढे पसरलेले आहे, परमेश्वराने दिलेल्या हातांनी कितीही मेहनत केली तरी पोटाची खळगी भरता येत नाही याचे दुःख आहे. परिस्थितीला मनुष्य बळी पडतो. आपले मेहनत जणू दारिद्र्याकडे गहाणच ठेवले आहे असे माणसाला वाटते. मेहनत करून कधी स्वाभिमानाने जगलेले पाहतो, तर बऱ्याच वेळा दारिद्र्यामुळे त्याच हातांचे कलम झाले असा भास होतो. जेव्हा केलेल्या कामाचा मोबदला मिळत नाही त्या वेळेला त्याच्या मनात अशी भावना निर्माण होते.
1234567890qwertyuiopasdfghjklzxcvbnm@#₹_%&-+()*"':;!?~`|•√π÷׶∆£€$¢^°={}\©®™℅[]☺️☹️☠️✌️