कवयि त्री बहि णाबाई यांच्या काव्याची वशिैशिष्ट्येलि हा.
Answers
Answer:
बहिणाबाई या निरक्षर , अशिक्षित होत्या . त्यामुळे त्यांची गाणी , कविता या सामान्य दर्जाच्या , जुनाट वळणाच्या असतील , असे कोणाचे मत होऊ शकते . पण त्या तशा नाहीत . त्यांच्या कविता रचनेच्या दृष्टीने अत्यंत आधुनिक आहेत . तसेच , त्या आशयाच्या दृष्टीनेसुद्धा अत्यंत आधुनिक आहेत . त्यांचे विचार , कल्पना आधुनिक काळातल्याच आहेत . त्यांचे सर्व विचार आजच्या काळातही पूर्णपणे लागू पडतात .। बहिणाबाईंची प्रत्येक कविता परिपूर्ण आहे . प्रत्येक कवितेत एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे . कवितेचा प्रारंभ आणि शेवट यांत नाट्यात्मकता आहे . ही बाब आधुनिक आहे . कवितेच्या रचनेकडे त्यांचे खास लक्ष आहे , हे दिसून येते . कवितेतला विचार किंवा भावना फापटपसारा न लावता सांगतात . कमीत कमी आणि नेमक्या शब्दांत आपला आशय मांडतात . यासाठी फार मोठे भाषिक आणि वैचारिक कौशल्य लागते . ते बहिणाबाईंकडे पुरेपूर आहे .आपली कविता लोकांना आवडावी ; लोकांनी ती सतत गुणगुणत राहावी , यासाठी बहिणाबाई जाणीवपूर्वक कर्णमधुर शब्दांचा वापर करतात , असे दिसत नाही . आशयाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशा सोप्या सोप्यासोप्या , छोट्याछोट्या व सुंदर शब्दांची योजना त्या करतात . हेही त्या मुद्दाम करतात असे नव्हे बहिणाबाई या निसर्गाशी व खेड्यातील समाजजीवनाशी निर्मळ मनाने समरस झाल्या आहेत . निसर्गाचे दर्शन घेत असताना , घरात , शेतात काम करीत असताना त्या गुणगुणत कविता निर्माण करतात . त्यामुळे कामातली , निसर्गातली लय त्यांच्या कवितेला मिळते . म्हणूनच त्यांच्या कवितेतले शब्द सहजगत्या अवतरतात . हे सर्व आधुनिक आहे . अहिराणी भाषेचा उपयोग तर बहिणाबाईंच्या कवितेला एक वेगळेच अलंकार चढवतो . त्या भाषेतला सर्व गोडवा , सर्व सौंदर्य त्यांच्या कवितेला मिळते . भाषा अपरिचित म्हणून कविता अपरिचित राहत नाही . त्यांची कविता वाचता वाचता आपोआप कळत जाते ; हे त्यांच्या कवितेचे फार मोठे सामर्थ्य आहे .
ANSWER :
बहिणाबाई या एक निरक्षर अशिक्षित स्री होत्या. त्यांची काव्य भाषा खानदेशी आहे, त्यांची काव्य सरस आणि सोज्वळ आहेत. त्यांचे काव्य जुन्यात चमकणारी, नव्यात झळकणार आहे. काव्यप्रतिभा हे कविला लाभलेले निसर्गाचे देणे आहे, आणि ते त्यांना लाभलेले होते. बहिणाबाईंच्या कवितांचा अर्थ सहज समजतो.