English, asked by jdjdhdhdh, 1 year ago

kaziranga national park information in Marathi​

Answers

Answered by nisarahmed123
11

Answer:

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (असमीया: কাজিৰঙা ৰাষ্ট্ৰীয় উদ্যান, (Kazirônga Rastriyô Uddan), उच्चार /kaziɹɔŋga ɹastɹijɔ udːan/ (मदत·माहिती)) हे भारतातील आसाम राज्यातील गोलाघाट व नागांव जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. याचा समावेश जागतिक वारसा स्थानांत केलेला असून, जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी दोन-तृतीयांश गेंडे या अभयारण्यात सापडतात.[१] काझीरंगामध्ये अनेक वाघ असून २००६ मध्ये त्याला वाघांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. या जंगलात अनेक हत्ती, पाणम्हशी तसेच हरणे आढळतात. काझीरंगा अभयारण्यामध्ये अनेक दुर्मिळ पक्षी आढळतात. काझीरंगा हे भारतातील सर्वात जास्त सुरक्षित अभयारण्य मानले जाते.

काझीरंगामध्ये चार प्रमुख नद्या आहेत. यापैकी मुख्य म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी होय. तसेच अनेक छोटे-मोठे पाण्याचे तलावसुद्धा आढळतात. काझीरंगाला १९०५ मध्ये संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा मिळाला होता.

Similar questions