खेडयातील सुंदर सकाळ मराठी निबंध
Answers
Answer:
माझे एक मामा रत्नागिरीला राहतात. एकदा मी महिन्याच्या सुट्टीत मी माझ्या रत्नागिरीच्या मामाकडे राहायला गेलो होतो. माझ्या मामाच्या गावाचे नाव भोके आहे. निसर्गाच्या कुशीत विसावलेले हे एक छोटेसे गाव आहे. मोठ्या उत्साहाने मामाने मला त्याच्या गावाचे दर्शन घडवले. या आधीही एकदा मी मामाबरोबर त्याचे गाव पहिले होते. परंतु हे गाव मला पुन्हा पाहायला मिळणार याचा मलाही खूप आनंद झाला होताच. त्या दिवशी मी शेवटच्या बसने गावात पोहचलो होतो. पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. त्यामुळे त्या दिवशी मला गाव पाहता आले नाही. मी तसाच जेवून झोपून गेलो.
सकाळ होताच कानावर पक्षांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. कोंबड्याच्या बांगेने जणू सारे गाव झोपेतून जागे होत होते. पक्षांचा तो किलबिलाट मनाला प्रसन्न करून टाकणारा ओत. काहीच क्षणात वासरांचे हंबरणे, गायीच्या गळ्यातील घंटा नाद कानी पडू लागला. मला राहवलेच नाही. माझ्या डोळ्यांवरची झोप झटकन डून गेली. दात घासायला आरशासमोर उभे राहिलो. तर माझा चेहरा प्रसन्न दिसत होता. सकाळच्या प्रसन्न वातावरणाने माझ्या चेहऱ्यावर तेज आले असावे.
सकाळी दात घासल्यानंतर मामीने दिलेली गरमागरम चहा घेऊन ई आणि माझे मामा फेरफटका मारण्यासाठी गावात निघालो. घरातून बाहेर पडताच. सूर्याची कोवळी किरणे अंगावर पाडू लागली होती. शांत वातावरण व त्यातच पक्षांचा किलबिलाट मनाला प्रसन्न करून टाकणारे सारे वातावरण होते. मी या वातावरणाचा आनंद घेत मामाबरोबर चाललो होतो. एका रस्त्याने पुढे जात असताना काही शेतकरी आपल्या बैलगाड्या घेऊन शेताकडे निघाले होते. बैलगाडीचे डौलदार बैल आणि त्यांच्या गळ्यांतील घंटांचा आवाज वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण करत होता. गवळी दुध घेऊन गावात दुध देण्यासाठी निघाला होता. घरातील स्त्रिया आपल्या अंगणात सडा रांगोळी करण्यात मग्न होत्या. एका डोंगरा अडून सूर डोकावून पाहत होता. जणू तो त्या ढगांच्या रथात बसून पृथ्वीवर येण्यासाठी निघाला असावा. सूर्याच्या किरणांनी सारी सृष्टी न्हाऊन निघाली होती.
खळखळणारी नदी, नदीवरून पाणी घेऊन जाणाऱ्या गावातील स्त्रिया रस्त्याच्या शेजारी दोन्ही बाजूला असेलली हिरवळ. एक नवे रूप सृष्टीला प्रदान करत होती. सारे काही एका चित्रपटामध्ये चित्रित केलेल्या दृश्याप्रमाणे सारे काही डोळ्यांसमोरून जात होते. सकाळच्या प्रहराला देवळात पूजा करत असलेला पुजारी असो वा गावाचे गावाचे आल्हाददायक वातारण असो. काही थोडक्याच शब्दांत वर्णन करणे शक्यच होणार नाही. सारी दृश्ये मी माझ्या डोळ्यांत साठवून ठेवत होतो.
सूर्योदयापूर्वी चांदण्यांनी भरलेले आकाश मनाला मोहून टाकत होते. हवेतला तो गारवा, चंद्राचा शीतल प्रकाश जणू काही स्वर्गसुखाचा आनंद मिळावा तसे होते सारे. जसा जसा सूर्याचा प्रकाश येऊ लागला तसा पक्षांचा किलबिलाट वाढत गेला होता आणि चंद्राची शीतलता कमी कमी होत चालली होती. सकाळचा पक्षांचा किलबिलाट, विविध पक्षांचे आवाज वातावरणाला प्रसन्न करून ताकत होते. वातारणातील प्रसन्नतेने सारी सृष्टी चैतन्याने भारावली होती. अशी एक रम्य सकाळ मी या आधी कोठेही पहिली नव्हती वा अनुभवली नव्हती. ती मी पहिल्यांदा माझ्या मामाच्या गावी अनुभवली. सारे काही चित्रफितीप्रमाणे चालले होते. सारे काही मनमोहक होते. शी हे रम्य सकाळ मी कधीही विसरू शकत नाही.
Answer:
नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण सकाळ वर निबंध पाहणार आहोत, सकाळी पृथ्वीला स्पर्श करणारी सूर्याची पहिली किरणे अतिशय सुंदर आणि मस्त दिसतात. निसर्गाचे ते अनोखे दृश्य मनाला मोहित करते.
पहाट झाल्यावर कळ्या फुलू लागतात आणि पक्षी मधुर आवाजात गाऊ लागतात. सकाळी, एक थंड आणि आनंददायी वारा वाहतो, जो लोकांच्या हृदयाला उत्साह आणि उत्साहाने भरतो. मेहनती लोकांना हा सुखद काळ आवडतो. त्यांना या नैसर्गिक सौंदर्याचा खरोखर आनंद मिळतो.