Social Sciences, asked by karanghodake428, 7 hours ago

खाजगीकरण म्हणजे काय ?​

Answers

Answered by actshivamraj123
1

Answer:

एखादी इंडस्ट्री किंवा संस्था पब्लिक सेक्टर मधून प्रायव्हेट सेक्टर मध्ये ट्रान्स्फर करण्याच्या प्रक्रियेला खासगीकरण म्हणतात. पब्लिक सेक्टर मधील कंपन्या सरकार मार्फत चालवल्या जातात. खाजगीकरणामध्ये सरकार प्रायव्हेट कंपन्या आणि संस्थांवरील बंधने शिथिल करते. यामुळे सरकारी कंपन्या/संस्था ई.ना एक पर्याय उभा राहतो. तसेच सरकारदेखील काही जबाबदाऱ्यांमधून मुक्त होते.

जसे कि ऑइल इंडस्ट्री मधील खाजगीकरणाने अंबानी सारखा बिझनेसमॅन स्वतःचे पेट्रोल पंप टाकू शकतो. जेव्हा खाजगीकरण नव्हते (सुमारे १९९० च्या आधी) त्यावेळेस सर्व पेट्रोल पंप सरकारी कंपन्यांचे होते. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील खाजगीकरणामुळे बऱ्याच खाजगी शाळा आणि खाजगी शैक्षणिक संस्थाना परवानगी मिळाली. यातून कॉम्पिटिशन होऊन काही प्रमाणात शिक्षणाची क्वालिटी सुधारली तसेच सरकारची जबाबदारीदेखील थोड्याप्रमाणात कमी झाली.

Answered by mominashiraz2007
0

Answer:

वाणिज्यात खाजगीकरण हे शासकीय उद्योगाचे किंवा जाहीरपणे व्यापार केलेल्या कंपनींचे खाजगी कंपनी किव्वा कंपन्यांकडून करण्यात आलेले अधिग्रहण. खाजगीकरण झाल्यावर कंपनीचे शेर बाजारात सामान्यांना विकलेया नाही जात.

Similar questions