खो-खो या खेळाचे थोडक्यात माहिती लिहा
Answers
Answered by
7
खो-खो या खेळाचे थोडक्यात माहिती
खो-खो हा एक भारतीय मैदानी खेळ असून ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नसते. हा खेळ खेळण्यासाठी अतिशय सोपा आहे आणि लोकप्रियही आहे; तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो व हा खेळ उत्कंठावर्धक होतो.खो खो हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघांत खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे ९च खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) शिवाय हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.
Similar questions
English,
1 month ago
CBSE BOARD XII,
1 month ago
Math,
1 month ago
Computer Science,
2 months ago
Math,
2 months ago
English,
10 months ago
English,
10 months ago