खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.
एका झाडाच्या तळाशी काही उंदीर राहत होते. ते रोज झाडावर चढत झाडाच्या शेंड्यापर्यंत जात आणि फळे काढून खात. काही काळाने उंदरांना रोज रोज झाडावर चढण्याचा कंटाळा आला. ते एकत्र जमले. त्यांनी खूप विचार केला. झाड आडवे करावे. मग सर्व फांद्या जमिनीजवळ येतील. त्यामुळे उंच चढावे लागणार नाही. पटकन फळे काढता येतील....
Answers
उत्तर :
★ कथालेखन :
उंदरांचा मूर्खपणा
एका झाडाच्या तळाशी काही उंदीर राहत होते. ते रोज झाडावर चढत झाडाच्या शेंड्यापर्यंत जात आणि फळे काढून खात. काही काळाने उंदरांना रोज रोज झाडावर चढण्याचा कंटाळा आला. ते एकत्र जमले. त्यांनी खूप विचार केला. झाड आडवे करावे. मग सर्व फांद्या जमिनीजवळ येतील. त्यामुळे उंच चढावे लागणार नाही. पटकन फळे काढता येतील.
झाड आडवे करण्याचा निर्णय सर्व उंदीर मान्य करतात. परंतु त्यातील काही जेष्ठ उंदीर याला विरोध करतात. पण जेष्ठांचे मत विचारात घेतले जात नाही. उंदीर झाडांची मुळे कुरतडायला सुरुवात करतात. अधिक उत्साहात आणि जोमाने मुळे कुरतडत जातात आणि परिणामतः भलेमोठे झाड जमिनीवर पडते.
कामात मिळालेल्या यशामुळे उंदीरांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी झाडावरील सर्व फळे खायला सुरुवात केली . परंतु कोणत्याही गोष्टीला शेवट असतो. काही दिवसात सर्व फळे संपली आणि व्हायचा तोच परिणाम झाला. झाडांची मुळे तुटल्यामुळे झाडाला पोषण मिळणे बंद झाले, झाड पूर्णतः नष्ट झाले होते. त्यामुळे झाडांना नवीन फळे येणे शक्य नव्हते. या सर्व प्रकारामुळे उंदरांची उपासमार होऊ लागली.काहींचा त्यामध्ये मृत्यूही झाला. शेवटी त्यांना केलेल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला.
तात्पर्य : कोणतीही कृती करताना तिच्या चांगल्या आणि वाईट परिणामांचा विचार करावा.