खालील एका कथेचा पुर्वाध दिला आहे. त्यावरून कथा पूर्ण करा.
एक जंगल होते. जंगलाच्या राजा सिंहाने एकदा सर्व प्राण्यांची सभा घेतली आणि रोज एकेका प्राण्याने त्याच्या
भेटीला जावे असे घोषित केले. धूर्त सिंहाला घाबरून सर्व प्राणी एकेक करुण त्याच्या भेटीस जात; मात्र सिंहाच्या
भेटीस गेलेला प्राणी परत येत नसे. त्यामुळे जंगलात फार भीती पसरली. अशातच चतुर सशाची पाळी आली ...
Answers
Answer:
.... ससा हुशार होता. त्याने सिंहाचा काहीतरी बंदोवस्त करायचे ठरविले. ससा ठरलेल्या वेळेपेक्षा खूप उशीरा सिंहाच्या गुहेत पोहोचला.
ससा फार उशीरा आल्यामुळे सिंहाला कडाडून भूक लागली होती. तो सशावर रागावत म्हणाला, तू एवढ्या उशीरा का आलास? ससा नम्रपणे म्हणाला, 'महाराज मला यायला उशीर झाला, कारण वाटेत दुसर्या सिंहाने मला अडविले. त्याच्यापासून सुटका करून घेणे फार अवघड होते.'
दुसरा सिंह आणि तो ही या जंगलात? सिंहाने रागाने विचारले. 'होय महाराज,' ससा म्हणाला. सिंहाने त्याला तेथे घेऊन जाण्यास सांगितले. ससा सिंहाला घेऊन एका विहिरीपाशी आला व म्हणाला, 'महाराज दुसरा सिंह इथे आत राहतो. इकडे या आणि विहिरीत डोकावून पाहा.'
सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले. त्याला पाण्यात स्वत:चेच प्रतिबिंब दिसले. ते प्रतिबिंब म्हणजे दुसरा सिंहच आहे, असा त्याचा समज झाला. त्याने मोठ्याने गर्जना केली. त्याबरोबर पाण्यातील सिंहानेही गर्जना केली.
आता मात्र सिंहाचा राग अनावर झाला. त्याने रागाच्या भरात विहिरीत उडी मारली आणि तो पाण्यात बुडून मरण पावला.
उपदेश- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
Explanation:
I HOPE IT'S HELPFUL FOR YOU :)....
Explanation:
उत्तर एकदम correct आहे, मला बरं वाटलं