India Languages, asked by pravinmandalik2, 3 days ago

खालील कृती सोडवा. अ) तुमच्या विद्यालयामध्ये १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२१ या कालावधीत विज्ञान खेळणी बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्गशिक्षकांना लिहा. ​

Answers

Answered by rajraaz85
11

Answer:

दिनांक:१३ डिसेंबर २०२१,

प्रति,

माननीय वर्गशिक्षक,

सरस्वती महाविद्यालय,

कांदिवली पश्चिम-९५.

विषय: विज्ञान खेळणी बनवण्याची कार्यशाळेत सहभागी करून घेण्याबाबत.

माननीय महोदय,

मी राजेश पाटील इयत्ता दहावीत आपल्या शाळेत शिकत असून शाळेने आयोजित केलेल्या विज्ञान खेळणी बनवण्याच्या कार्यशाळेत मला सहभागी व्हायचे आहे. विज्ञान खेळणी बनवण्याची कार्यशाळा आपली शाळा स्वतः १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत आयोजित करत आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला. कारण कार्यशाळेत सहभागी झाल्यानंतर आपल्या विविध गुणांना वाव मिळतो.

मला विज्ञानाबद्दलची आवड अगदी लहानपणापासून होती व विज्ञानातील खेळणी कसे बनवायचे हा प्रश्न माझ्या मनात नेहमी असायचा. आता त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी या कार्यशाळेची मला खूप मदत होईल.

मी आपणास विनंती करतो की, या कार्यशाळेत सहभागी होण्याची मला संधी द्यावी.

आपला विद्यार्थी,

राजेश पाटील

इयत्ता दहावी

Similar questions