२. खालील काव्य पंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
'मी भिकारी : मी शब्दांना काय देऊर
मी कर्जदार :शब्दांचा कसा उतराई होऊर
मी शब्दांत शिरलो आणि स्वतःला वाचविले:
जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचविले.'
Answers
Answer:
gdudufxjgfhiyixihxigfjgfyfiyydigfkhckhckbc
Answer:
शब्दाबद्दल असणारा आदर आणि शब्दांचे कवीच्या जीवनातील स्थान, तसेच शब्दाबद्दल असणारे त्यांचे प्रेम ते या कवितेतून स्पष्ट करतात.
कवी म्हणतात की शब्दांना मी काहीच देऊ शकत नाही कारण मी भिकारी आहे कारण शब्दांचे सामर्थ्य खूप जास्त आहे. शब्दांमुळे माझी झोळी भरली आहे आणि मला सामर्थ्य प्राप्त झाले आहे त्यामुळे शब्दांचा मी कर्जदार आहे व ते कर्ज मी आयुष्यभर उतरवू शकत नाही असे ते म्हणतात.
कवीने त्यांच्या आयुष्यातील अतिशय भेदक प्रसंग आपल्यासमोर मांडतात ते म्हणतात आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगी त्यांनी शब्दांचा सहारा घेतला आणि कठीण प्रसंगाला तोंड दिले.
शब्दांना शरण गेल्यामुळेच शब्दांनी त्यांना अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढले व शब्दांनी ते जहर पिले असे ते म्हणतात. शब्दाबद्दल असणारी त्यांची कृतज्ञता आपल्या कवितेच्या माध्यमातून ते स्पष्ट करतात.