खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा
बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन
खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात.
Answers
ऐक मुलगा हातात चेंडू घेऊन खेळत आहे. तो चेंडु उंच उंच फेकून झेलत आहे हातात.
Answer:
कवयित्री नीरजा यांच्या आश्वासक चित्र या कवितेतील वरील ओळी आहेत. कवयित्री नीरजा यांनी प्रस्तुत कवितेत लहान मुलांच्या खेळण्यातून स्त्री-पुरुष समानतेचे चित्र रेखाटले आहे.
कवयित्री घराच्या खिडकी मधून बघत आहे. एक लहानशी मुलगी झाडाच्या पलीकडे बसून भातुकलीचा खेळ खेळत आहे. तिने आपला छोटासा संसार मांडलेला आहे. त्याच वेळेस दुसरीकडे एक मुलगा त्याचा खेळ खेळत आहे. तो खेळ आहे चेंडू मुलगा चेंडू खूप उंचावर उडवून हातात चेंडू झेलत आहे. उंचावर उडवल्यानंतर देखील त्याचा चेंडू बरोबर त्याच्या हातात खाली येतो. उंचावर उडवलेल्या चेंडूला हातात झेलणे हे त्या मुलाचे कसब आहे.
हा त्याचा रंगलेला खेळ भातुकलीचा खेळ खेळणारी मुलगी बघत आहे. तिला त्याचे फार नवल वाटत आहे. मुलगी तिच्या मांडीवर असलेली बाहुली बाजूला ठेवते. आणि त्या मुला जवळ जाते आणि मलाही हा खेळ शिकव असे सांगते. त्या वेळेस मुलगा म्हणतो तू तुझं काम कर तुला नाही जमणार. त्या वेळेस मुलगी उत्तर देते मी एकाच वेळेस दोन्ही काम करू शकते. मग मुलगा त्या मुलीच्या हातात चेंडू देतो. ती मुलगी देखील मुलाला घरातील कामे शिकवते.
कवयित्री म्हणतात येणाऱ्या भावी पीडित स्त्री पुरुष समानता ही असणार आहे. त्यामुळे येणारी पिढी हा विचार रुजविणार आहे.