Hindi, asked by neel99478, 4 days ago

३) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे.​

Answers

Answered by madekaraparna
16

Answer:

कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. खोल खोल मातीखाली निर्मळ झरा असतो. तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते. हतबल न होता, हिंमत न हारता प्रयत्नरत असावे. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा, आनंदाचा अक्षय झरा असतोच. म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये. अंतिमतः प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते.

Answered by rajraaz85
6

Answer:

वरील काव्य पंक्ति या आसावरी काकडे या कवयित्रीच्या खोद आणखी थोडेसे या कवितेतील आहेत.

कवितेच्या माध्यमातून कवयित्री ह्या प्रत्येकाला सकारात्मक राहण्याचा संदेश देतात. जर कोणतीही गोष्ट माणसाने ठरवली व ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी अतिशय मेहनतीने व चिकाटीने प्रयत्न केले तर कितीही कठीण गोष्ट राहिली ती आपण साध्य करू शकतो. स्वतःचा आत्मविश्वास आणि सतत मेहनत करणे या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर यश नक्की मिळते.

वरील काव्यपंक्ती च्या माध्यमातून कवयित्री सांगतात की माती जर खोदली तर झरा हा नक्की लागेल फक्त ती माती खोदत असताना खूप मेहनतीने खोदली पाहिजे. सतत प्रयत्न केले तर कितीही अडचणीतून आपण रस्ता काढू शकतो हा संदेश या कवितेच्या माध्यमातून कवयित्री ला द्यायचा आहे.

जर ध्येय शक्ती असेल तर कुठल्याही संकटाला व्यक्ती पार करू शकतो व जगण्याचे बळ मिळू शकते असे कवयित्री म्हणते.

Similar questions