Hindi, asked by aabasahebchavan2, 7 months ago

खालील कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा​

Answers

Answered by storiesinhindighost
0

Answer:

आभाळाची अम्ही लेकरे' या कवी वसंत बापट यांच्या कवितेत कवीने कष्टकऱ्यांचे जीवन मांडले आहे.

कष्टकरी हे निसर्गाचे सुपुत्र आहेत. मोकळे आकाश हे त्यांना पित्यासमान, तर काळी माती त्यांना मातेसमान आहे. आभाळाची व जमिनीच्या मायेची छत्रछाया त्यांना लाभते, त्यांचे भरणपोषण होते. ते निसर्गात वाढतात. निसर्ग हा नियमित व अथकपणे आपले कार्य करत राहतो. त्याचप्रमाणे निसर्गाची लेकरे असणारे कष्टकरी नियमित व अथकपणे कष्ट करत राहतात. कष्ट करणे हीच त्यांची ओळख, कष्ट हाच त्यांचा देव, कष्ट हाच त्यांचा धर्म, म्हणून त्यांना वेगळी जात नाही किंवा त्यांचा वेगळा धर्म नाही, असे प्रस्तुत ओळींद्वारे कवीला म्हणायचे आहे.

Explanation:

MAKE ME AS BRAINLIEST

Similar questions