India Languages, asked by bhoomaayyy, 2 months ago

खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहून शीर्षक लिहा.(7) एका जंगलात एक साधू रहात होते .......साधूचीवृत्तीपरोपकारी ---- मुसळधारपाऊस ---एकवाटसरू -----झोपडीचेदारवाजवणे-----सरधूनेझोपडीतघेणे ----झोपडीलहान----- आणखीकाहीवाटसरुनीदारवाजवणे -----साधूनेआतघेणे------ खूपअडचणहोणे----- उभ्यानेरात्र काढणे ----पाऊस थांबणे ----- सगल्यानी विचार करणे ----- अडचणीतनेहमीचएकमेकांची साथ द्याव.​

Answers

Answered by saradaditi
0

आनंद नावाचा एक शेतकरी होता. तो खूप कष्ट करीत असे. त्याचे काम म्हणजे एका गावाहून दुस-या गावाला पायी जाणं, त‌थिून बी-बियाणे आणून विकणे आणि त्यातीलच बियाणे आपल्याही शेतात पेरणं. ते बी-बियाणे आणायला जाताना तो कायम दोन पोती घेऊन जात असे. त्यातील एका पोत्याला छिद्र होतं. पण तरीही तो दोन्ही पोती भरून धान्य घेई आणि गावी येत असे. घरी पोहोचेपर्यंत छिद्र असलेलं पोतं बरंचंसं रिकामं होत असे. ते पाहून शेतक-याचा मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला, तुम्ही हे फाटकं पोतं कां नेता? त्यामुळे आपलं नुकसान होत आहे. त्यावर शेतकरी म्हणाला, हे मुला, असं नाही. असं केल्याने माझं नुकसान होण्याऐवजी खूप फायदाच झाला आहे. या छिद्रवाल्या पोत्यात मी शेतातल्या धान्याचं बियाणं भरतच नाही. त्यात मी त‍ऱ्हत‍ऱ्हेच्या झाडांचं बियाणं भरतो. ज्या रस्त्याच्या कडेने मी जातो त्या रस्त्याच्या कडेला पोत्यातले बियाणे सांडत जातं तिथे पाऊस पडल्याने ‌ते बियाणं जमिनीत रुजतं. ‌त्याची झाडं येतात. आता त्या रस्त्याच्या कडेला अनेक लहानमोठी झाडं तयार झाली आहेत. त्यांना छान सुगंधी फुलं, निरनिराळी फळं लागली आहेत. काही झाडं विशाल झाली आहेत. त्यामुळे येता-जाताना त्या झाडांची सावली मिळते. फुलांचा सुगंध आणि खायला फळे यामुळे थकवा येत नाही आणि माझा प्रवास सुखकर होतो. माझ्या प्रमाणेच त‌थिल्या इतर वाटसरुंनाही त्याचा फायदा होतो. त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहून मलाही समाधान मिळतं. बाळा त्या छिद्रवाल्या पोत्याने मला इतका आनंद दिलाय. मग ते पोतं मी का टाकून देऊ?

Similar questions