India Languages, asked by anaudv3u, 2 months ago

खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहा.

तहानलेला कावळा- पाण्याचा शोध - एका ठिकाणी मडक्यात पाणी दिसते पण खोल गेलेले चोच पोहोचत नाही- खडे टाकत राहतो पाणी वर चढते पाणी पितो. -

* कथेला शीर्षक द्या आणि तात्पर्य लिहा.​

Answers

Answered by jadhavrekha830
10

Answer:

खूप कडक उन्हाळा होता. एक कावळा तहानेने खूपच कासावीस झाला होता. पाण्याच्या शोधात तो उडत-उडत इथे तिथे फिरत होता. दृष्टी तीक्ष्ण असतानाही त्याच्या नजरेस पाणी पडत नव्हते. अचानक त्याला एका घरासमोर चंबू दिसला. तिथेच घिरटय़ा घालत त्याने अंदाज घेतला. त्या चंबूत पाणी होते.

तो कावळा खाली आला आणि चंबूजवळ बसला. त्याने चंबूत चोच घातली, पण पाणी काही चोचीला लागले नाही. कारण पाणी त्या चंबूच्या तळाशी होते. तहान तर, खूप लागली होती. पाणी समोर होते. पण प्यायचे कसे? तो विचार करत आजूबाजूला पाहू लागला. तेवढय़ात त्याचे लक्ष चंबूच्या आसपास पडलेल्या लहान-लहान खडय़ांकडे गेले. त्याने एक-एक खडा त्या चंबूत टाकायला सुरुवात केली. काही खडे टाकल्यानंतर पाणी थोडे वर आल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याला आनंद झाला.

त्याने आणखी खडे गोळा केले आणि चंबूत टाकायला सुरुवात केली. एक-एक खडा चंबूत पडत होता आणि हळूहळू पाणी वर-वर येत होते. अखेर कावळ्याच्या या प्रयत्नांना यश आले. ते पाणी चंबूच्या काठापर्यंत आले. तेव्हा आपली चोच बुडवून तो कावळा भरपूर पाणी प्यायला आणि आपली तहान भागवली.

तात्पर्य : प्रत्येक अडचणीतून मार्ग काढता येत

Answered by niloferkasmani0
0

Answer:

udte6wuwhgw6e7euegey7e

Explanation:

Similar questions