खालील मुद्द्यांच्या आधारे क्रीडांगणाचे आत्मकथन लिहा . 1) आनंद 2) महत्त्व / गरज 3) क्रीडांगणापेक्षा टीव्हीचा प्रभाव 4) मी क्रीडांगण बोलत आहे 5) क्रीडांगणावर अतिक्रमण 6) आजची स्थिती 7) खंत
Attachments:
Answers
Answered by
19
Answer:
हे पाहा मुलांनो ! अरे , इकडेतिकडे पाहू नका , बावरू नका . तुम्ही जिथं उभे आहात ना ते मैदानच म्हणजे मी तुमच्याशी बोलत आहे . तुम्ही खेळण्यासाठी मित्रांची वाट पाहत आहात ना ? म्हटलं , तेवढ्यात तुमच्याशी थोड्या गप्पा माराव्यात . म्हणून तुम्हांला हाक मारली !
अरे मुलांनो , तुम्ही माझ्याजवळ आलात की मी खुशीत असतो . तुमच्यासारखी खूप मुलं यावीत असंच मला वाटत असतं . मुलं असतील तर खरं चैतन्य संचारतं येथे . माझा जन्म झाला तेव्हापासून आजपर्यंत शेकडो , नव्हे हजारो मुलं इथून खेळून गेली आहेत तुम्हांला ठाऊक नसेल कदाचित वाडेकर , गावस्कर , वेंगसरकर , तेंडुलकर वगैरे खेळाडू नावाजलेले नव्हते , तुमच्यासारखेच साधे विदयार्थी होते , तेव्हा ते येथे , माझ्या अंगाखांदयावर खेळले आहेत . मला त्यांचा खूप अभिमान वाटतो . कधीही त्यांची नावं ऐकली की ऊर भरून येतो !
मुलांनो , इथे माझा जन्म झाला , तोच मुळी तुमच्यासाठी . काही वर्षांपूर्वी येथे अवतीभवती खूप इमारती उभ्या राहू लागल्या होत्या . लोकवस्ती भराभर वाढत चालली होती . लोकांच्या लक्षात आले की , हजारो माणसे इथे राहणार , पण त्यांच्या मुलांसाठी खेळायला साधं मैदान नाही ! काहीजणांनी मग प्रयत्न केले . काहीजणांनी हातभार लावला आणि त्यातून माझा जन्म झाला .
मी किती मोठं कार्य करतो ठाऊक आहे ? मुलांच्या खेळण्याची सोय तर मी केलेलीच आहे . शिवाय , माझ्या काठाकाठाने मोठमोठे डेरेदार वृक्ष डौलात उभे आहेत . या परिसराचं मोठं वैभव आहे ते . संध्याकाळी लहान मुलं व बायकासुद्धा येथे विरंगुळ्यासाठी येतात . सकाळी व संध्याकाळी फेरी मारण्यासाठी ज्येष्ठ नागरिक तर आवर्जून येतात . इमारतींनी भरलेल्या या परिसरात ही माझी जागाच तेवढी मोकळी आहे . काहीजण त्यामुळेच हे मैदान म्हणजे या परिसराचं फुप्फुस आहे , असं म्हणतात . केवढा हा माझा सन्मान !
मात्र अलीकडे मला वेदना होऊ लागल्या आहेत . काही दुष्ट लोक माझे लचके तोडत आहेत . मला बळकावण्याचं कारस्थान चालू आहे . शिवाय सगळेजण येऊन येथे घाण करतात . सकाळी तर दुर्गंधी पसरते ! फेरीवाले , भिकारी यांनीही माझे लचके तोडण्याचे काम चालू ठेवलं आहे . काहीजण इथली झाडंही अकारण तोडत असतात . असं दुर्दशेत राहण्यापेक्षा माझा उपयोग फक्त मुलांना खेळण्यासाठीच असेल , असा कायदा केला तर किती बरं होईल ?
Similar questions
Environmental Sciences,
20 days ago
Math,
20 days ago
Math,
1 month ago
Math,
1 month ago
Computer Science,
9 months ago