- खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
वर्गातर्फे 'सुंदर हात' स्पर्धेचे आयोजन --सर्वांचा सहभाग -- हात सुंदर दिसावे
म्हणून प्रत्येकाचे प्रयत्न -- स्पर्धेचा दिवस -- सर्वजण उत्सुक --मोनाचा स्पर्धेतील
सहभागाला नकार --कष्टाने रापलेले न सजवलेले हात लपवणे --बाईंकडून सर्वांच्या
हातांचे निरिक्षण -- मोनाचे हात - बक्षीसपात्र -
Answers
दिलेल्या माहितीवरील कथेचा खाली उल्लेख आहेः
Explanation:
- आमच्या वर्गाने 'सुंदर हाट' ची एक स्पर्धा आयोजित केली.
- त्यांनी निश्चित केले आहे की प्रत्येकजण सहभागी होत आहे त्यांनी त्यांच्या परिश्रमांसारखे सुंदर दिसले पाहिजे.
- प्रत्येकजण सहभागी होण्यासाठी आणि त्यांची कौशल्ये दर्शविण्यासाठी उत्सुक होता.
- मोनाने स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला.
- त्यानंतर, आम्ही असंघटित गोष्टी लपविण्याचा प्रयत्न केला जेणेकरुन ते इतरांना आकर्षित करेल.
- डावीकडून उजवीकडे मोनाचा हात दिसत होता परंतु त्यांनी ते सजावटीने लपविण्याचा प्रयत्न केला.
- शेवटी सर्वोत्कृष्ट व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला.
Answer:
सुंदरता ही कष्टात असते...
अभिनव विद्यालयातील 10वीच्या वर्गात वर्ग शिक्षिका मोरे बाई ह्या 'सुंदर हात' स्पर्धेचे आयोजन करतात. सर्व 10वी वर्गातील मुले व मुली या स्पर्धे करीता खूप उत्सुक असतात. त्यामुळे सर्व या स्पर्धेत भाग घेतात. सर्वांना स्पर्धा जिंकायची असते म्हणुन सर्वजण, आपले हात सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करतात. जसे काही जण चकचकीत हात धुवून येतात तर काहींचा काहीतरी विभिन्न प्रयत्न.
तर स्पर्धेचा दिवस येतो. सर्व मुले स्पर्धे साठी उत्सुक असतात. सर्वामध्ये मोना नावाची मुलगी ही स्पर्धे साठी इच्छुक नव्हती. कारण ती गरीब होती आणि त्यामुळे कष्ट करून, काम करून तिचे हात काळे तसेच कडक झालेले. तिला दुसर्याचे हात पाहून लाज वाटत होती. म्हणुन ती तिचे हात लपवत होती. तर स्पर्धेची सुरुवात झाली, बाई सर्वांचे हात बघू लागल्या. सर्वांचे हात मऊ आणि गोरे, अतिशय सुंदर. परंतु जेव्हा त्यांनी मौनाचे हात बघितले तेव्हा त्यांना तिचे कौतुक वाटले. परंतु मोनाला हात दाखवू नको वाटत होते. सर्व मुले ही तिच्या हातांकडे पाहून हासत होती. सर्वांचे हात बाईनी पाहून घेतले. आता बाई निकाल जाहीर करणार होत्या व त्यांनी मोनाला सुंदर हात स्पर्धेचे विजेतेपद दिले. हे ऐकून सर्व अचंबित झाले. मग बाई बोलल्या की मी हेच बघत होते की कोण खरोखर मेहनत करते, सर्वांचे हात सुंदर आहेच पण कष्ट करून जे हात अभ्यास करतात अश्या या मोनाचे विशेष कौतुक. मोनाला हे ऐकून खूप आनंद झाला. अश्या रितीने मुलांना कष्टाचे महत्व पटले.
Moral- सुंदर हात असल्याने काही होत नाही परंतु त्या हातांचा योग्य उपयोग केला तर नक्की यश मिळते.