खालील मुद्द्यांच्या आधारे 'माझा आवडता खेळ' या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.
तो कसा खेळतात.
माझा आवडता खेळ
→ खेळात मिळणारा आनंद
तो खेळ का तुमचे प्रेरणास्थान. त्या खेळातील
आवडतो?
तुमचे कौशल्य
कसे वाढवाल?
Answers
Explanation:
तुमचा निबंध धन्यवाद!!!!•••••
Answer:
माझा आवडता खेळ
खेळाचे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे स्थान आहे. प्रत्येकाने खेळ हा खेळलाच पाहिजे त्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी राहण्यास मदत होते. मला तसे अनेक खेळ आवडतात परंतु माझा सर्वात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट.
मी अगदी लहानपणापासूनच क्रिकेट खेळायला लागलो. माझा मोठा दादा क्रिकेट खेळत असल्यामुळे मलाही घरातूनच क्रिकेटचे धडे मिळायला सुरुवात झाली. अगदी वयाच्या चार ते पाच वर्षापासून मी हातात बॅट घेऊन क्रिकेट खेळायला लागलो. नंतर हळूहळू माझ्या दादासोबत मी क्रिकेटच्या मॅचेस बघू लागलो. भारतीय क्रिकेट संघातील विराट कोहली हा माझा सर्वात आवडता खेळाडू आहे. परंतु त्यामुळे आधी मला एक नायक म्हणून जर कोणी प्रभावी केले असेल तर तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात ने खरच प्रभावी झालो आणि हळूहळू मी त्याला बारकाईने त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ लागल्यामुळे माझ्याही वागण्यात त्याच्यासारखा संयमी पणा दिसू लागला. मला अनेक क्रिकेटर आवडतात परंतु माझे प्रेरणास्थान जर कोण असेल तर तो माझा दादा. त्याच्याकडून मला बॅट कशी पकडावी व शॉट कसा मारावा याचे प्रशिक्षण लहानपणापासूनच मिळाले.
माझ्या मोठ्या दादाच्या प्रशिक्षणामुळे मी आज एक चांगला बॅट्समन झालो आहे. त्याने प्रत्येक वेळेस मला मार्गदर्शन करून माझी बॅटिंग कशी चांगली होईल याकडेच लक्ष दिले आणि म्हणूनच आज मी आमच्या शाळेच्या क्रिकेट संघाचा कॅप्टन आहे. तसेच राज्यस्तरीय स्कूल कॉम्पिटिशन मध्ये देखील मी सहभाग घेतला आहे.
दररोज नित्यनियम पणे सराव, कठोर मेहनत करून मला माझे कौशल्य अजून वाढवायचे आहे व आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहील.