India Languages, asked by Jatinsahil3736, 1 year ago

खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.

Attachments:

Answers

Answered by gadakhsanket
73

नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "इंग्लंडचा हिवाळा" या पाठातील आहे. या पाठाची लेखिका इरावती कर्वे आहेत. या पाठात इंग्लंडमधील हिवाळ्याचे आणि पावसाळ्यातील धुक्याचे वर्णन केले आहे.अतिशय चांगल्या शब्दात ऋतूंमधील साम्य आणि भेद रेखाटले आहेत.

★ भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन

उत्तर- महाबळेश्वर

भौगोलिक स्थान:सह्याद्रीच्या डोंगरकुशीत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध.

ऐतिहासिक स्थळे:घाट चढल्यावर लगेच प्रतापगड आहे.हा परिसर जावळीचे खोरे म्हणून प्रसिद्ध आहे.प्रतापगडाच्या पायथ्याशीच अफजल खानाची व शिवाजी महाराजांची भेट झाली होती. हा इतिहास आजही आपल्या डोळ्यासमोर येतो. विशाळगड याच परिसरात आहे.

सांस्कृतिक वैशिष्ट्ये- पाच नद्यांचा संगम असलेल्या जुन्या महाबळेश्वर मध्ये देऊळ बांधलेले आहे. आजूबाजूला आणखी इतर देव-देवतांची मंदिरे आहेत.ज्या त्या मंदिरात वेगवेगळे उत्सव साजरे होतात. पाचगणीत अनेक सांस्क्रुतीक कार्यक्रम साजरे होतात.

उल्लेखनीय बाबी: येथे जवळच पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे.पाचगणी व महाबळेश्वर हे थंड हवेची ठिकाणे असल्याने येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. थंडीत धुके पसरलेले असते. येथे स्ट्रॉबेरी पिकतात.स्ट्रॉबेरी शेतात जाऊन ताज्या स्ट्रॉबेरी खाता येतात. अनेक हॉटेल्स, बंगले लोकांनी आधीच बुक केलेली असतात. खोल दऱ्यामधून वर येणारे डोंगर दिसतात.

नैसर्गिक वैशिष्ट्ये: सह्याद्री पर्वतरांगा असल्याने येथे भरपूर पाऊस पडतो.थंडी खूप असते.उन्हाळ्यात थंड वातावरण असल्याने पर्यटकांची गर्दी असते.

त्या भागातील मानवी जीवन:येथील मानवी जीवन जवळजवळ पर्यटकांवर अवलंबून असते. गाईड,घरगुती जेवणाची सोय,बंगल्यात राहण्याची सुविधा असे छोटे मोठे व्यवसाय करून आपले जीवन जगतात.

धन्यवाद...

Similar questions