खालील मुद्द्यांना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
(१) करारीपणा (२) आजीचा गोतावळा
Answers
(1) पुढील मुद्द्यांना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा :
(1) पुढील मुद्द्यांना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा : ( १ ) करारीपणा ( २ ) आजीचा गोतावळा .
उत्तर :
( १ ) करारीपणा : सातबा घोरपड्याच्या मुलाच्या संदर्भात आजीने स्वतः न्याय दिला व त्याची शिक्षा रद्द केली . या प्रसंगी सख आजीने दाखवलेला करारीपणा वाखाणण्याजोगा आहे ; कारण गावबैठकीतील सर्व पंचांनी घोरपड्याच्या मुलाला शिक्षा केली होती . पण लहान मुलाची चूक ही पदरात घेऊन त्याला माफ करायचे असते , हा धडा आजीने ग्रामसभेला शिकवला . आजीला गावात किती मान होता हे या प्रसंगातून स्पष्ट होते व तिची न्यायदृष्टी किती निखळ व निर्मळ होती हे दिसून येते . आजीच्या या धाडसामुळे कोवळा जीव वाया गेला नाही . आजीच्या या करारीपणाचे व्यक्तिमत्त्व आपल्यालाही नकळत शिकवण देते .
( २ ) आजीचा गोतावळा : सखू आजी गावातील कुणाच्याही सणा - समारंभाला जायची व पुढाकार घ्यायची . तिने आयाबायांना साक्षर केले . अंगठेबहादर सरपंचाला सहीपुरता साक्षर केला . गावात पहिल्यांदा पोलीस झालेल्या तरुणाला आजीने गावच्या बायकांना गोळा करून ड्रेसवर ओवाळले व दही - साखरेने त्याचे तोंड गोड केले . आजीला गावामध्ये लहान - थोर माणसे मान देत असत . तिचे करारी व्यक्तिमत्त्व सगळ्यांना योग्य न्याय देणारे होते . अशा प्रकारे सारा गाव हा सखू आजीचा गोतावळा होता .
Answer:
The above attachment is your answer.
Explanation: